Gold  Saam tv
बिझनेस

Gold Rate : सोनं ८५ हजार रूपये तोळा होणार, वाचा १२ हजारांनी सोन का स्वस्त होणार?

Gold Price : सोनं ८५ हजार रूपये तोळा होण्याची शक्यता आहे. एकंदरीत सोनं १२ हजारांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामागे अनेक कारणे आहेत. वाचा सविस्तर

Vishal Gangurde

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. याच सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाखांपर्यंत पोहोचला होता. सध्या सोन्याचा दर १० ग्रॅम ९७००० रुपयांपर्यंत स्थिरावला आहे. मात्र, मार्केट तज्ज्ञांनी सोन्याचा दर १२ हजारांनी घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सोन्याचा एका तोळ्याचा भाव पुढील काही आठवड्यात ८०००० रुपये ते ८५००० रुपयांपर्यंत घसरू शकतो. एप्रिल आणि मे महिन्यात सोन्याचा दर १० टक्क्यांनी घसरला होता. जागतिक घडामोडी आणि आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याचा किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान सोन्याच्या दरात २००० रुपयांनी घसरण झाली होती. तसेच सध्याच्या जागतिक घडामोडीमुळे सोन्याचा दरात पुन्हा एकदा घसरण होण्याची शक्यता आहे. त्याला अनेक कारणे आहेत.

नफा बुकिंगमुळे घसरण

सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यात गुंतवणूकदार नफा बुक करण्यासाठी विक्री करतात. अलीकडे सोन्याचा एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये वाढ झाल्याने बाजारात विक्रीचा दबाव वाढलाय. २०२५ मध्ये सोन्याचा एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये ३,७५१ कोटींची गुंतवणूक झाली होती. परंतु फेब्रुवारी महिन्यात १,९७९ कोटींनी घसरली. एकंदरीत ४७.२२ टक्क्यांनी घट झाली. नफा बुकिंग आणि इक्विटी बाजारातील परिणामामुळे झालं.

जागतिक राजकीय घडामोडींचा परिणाम

जगातील भूराजकीय तणावामुळे सोन्याचा किंमतीवर मोठा प्रभाव दिसून येतो. सध्या अमेरिका देश टॅरिफबाबत सोम्य धोरण स्वीकारताना दिसत आहे. आता भारत-पाकिस्तानचा तणावही कमी झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतणुकीबाबतचं आकर्षण कमी झालं आहे.

आरबीआयचं धोरण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मोनेटरी पॉलिसीसाठी ६ जून २०२५ रोजी बैठक होणार आहे. स्टेट ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आरबीआय ५० बेसिस पॉइंट्सने रेपो दर कमी करण्याची शक्यता आहे. रेपो दर कमी झाला तर कर्ज घेण्याची किंमत देखील कमी होईल. यामुळे आर्थिक वाढीस चालना मिळेल. या कारणामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम दिसून येईल. कमी व्याजदरांमुळे सोन्याला पर्यायी गुंतवणूक साधनांशी स्पर्धा वाढेल, अशी शक्यता व्यक्ती केली जात आहे.

यूएस फेडरल रिझर्व्हची व्याजदर धोरण

जेरोम पॉवेल यांच्या नेतृत्वाखालील फेड, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे डॉलरच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. व्याजदर स्थिर राहिले किंवा वाढल्यास सोन्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. यामुळे लोकांचा पर्यायी गुंतवणूकीकडे ओढा वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT