Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

दिवाळीनंतर सोन्याचे भाव वधारले; चांदीचा दर जैसे थे, आठवड्याच्या शेवटी सोनं कितीनं महागलं?

Gold Prices Hit New High Post-Diwali: दिवाळीनंतर सोन्याच्या भावात वाढ. २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा दर १२,५०० ने वाढला आहे. चांदीच्या दरात कोणताही बदल नाही.

Bhagyashree Kamble

  • दिवाळीनंतर सोन्याच्या भावात वाढ.

  • २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा भाव किती?

  • चांदीच्या दरात किती बदल?

दिवाळीपासून सोनं आणि चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीचे दर कधी वाढताना दिसत आहे. तर, कधी भावात घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळीआधी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दराने शिखर गाठले होते. दिवाळीत सोन्याच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळाली. मात्र, आज सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. आज २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात १२, ५०० रूपयांची वाढ झाली आहे.

आज २५ ऑक्टोबर २०२५. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,२५० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२५,६२० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १२,५०० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,५६,२०० रूपये मोजावे लागतील.

२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या भावातही वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात १,१५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१५,१५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ११,५०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,५१,५०० रूपये मोजावे लागतील.

२४, २२ सह १८ कॅरेट सोन्याच्या भावातही वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात ९४० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९४,२२० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ९,४०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,४२,२०० रूपये मोजावे लागतील.

सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, चांदीचे दर जैसे थे आहे. चांदीच्या दरात बदल झालेला नाही. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,५५,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Blockage Symptoms: छातीत सतत जळजळ होतेय? अ‍ॅसिडीटी नाही, तर रक्तवाहिन्या ब्लॉकेजचा धोका, वाचा लक्षणे आणि उपाय

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात तुफान पाऊस

BB19: 'वीकेंड का वार' मध्ये एक नाही तर दोन स्पर्धक पडणार बाहेर; या सदस्यांना करावा लागणार एविक्शनचा सामना

Satara Doctor Death : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात भाजपच्या माजी खासदारांचं नाव|VIDEO

Paneer Butter Masala Recipe: ढाबा स्टाईल पनीर बटर मसाला घरी कसा बनवायचा? रेसिपी आहे अत्यंत सोपी

SCROLL FOR NEXT