Gold and Silver Rates Down Saam
बिझनेस

सोनं आजच खरेदी करा; २,६२० रूपयांनी स्वस्त, चांदीच्या दरातही कमालीची घट, जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold and Silver Rates Down: ग्राहकांसाठी खुशखबर; सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण. आठवडाभरात २४ कॅरेट सोन्याची किंमत २,६२० रूपयांची कमी.

Bhagyashree Kamble

दिवाळीनंतर सोन्याच्या भावात कमालीची घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण झाली आहे. एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याची किंमत २,६२० रूपयांनी कमी झाली आहे. राजधानी दिल्लीत प्रति १० ग्रॅम दर १,२३, १५० रूपयांपर्यंत घसरला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली असून, एका आठवड्यात सोनं २,४०० रूपयांनी स्वस्त झाले आहे. चला, २ नोव्हेंबरचा सोन्याचा दर किती?

दिल्लीतील सोन्याचा भाव

दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२३,१५० रूपये इतके आहे. तर, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत १,१३,१६० रूपये इतकी आहे. सोन्याच्या भावात घट झाल्यामुळे ग्राहकांची पावलं सराफाच्या दुकानांकडे वळली आहेत.

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता

सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,१२,७५० रूपये इतके आहे. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत १,२३,००० इतकी आहे. शनिवारी इंदूर सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम १०० रूपयांची घसरण झाली आहे. सरासरी प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत १,२१,५०० इतकी झाली आहे.

चांदीच्या किमतीतही कमालीची घट

एका आठवड्यात चांदीच्या किमतीत प्रति किलो ३००० रूपयांची घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या आठवड्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर १,५२,००० रूपये इतके आहे. सोन्यासह चांदीच्या दरात घट झाल्यामुळे ग्राहकांमध्ये वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्कलकोट नगरीत दाखल

Hardik Pandya Girlfriend: हार्दिक पांड्यासोबत साखरपुड्याची चर्चा; माहिका शर्मा संतापली, म्हणाली - 'आता गरोदरपणाच्या...'

'का रे दुरावा!' देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंच्यामध्ये २ खुर्च्यांचं अतंर, नेमकं कारण काय? CMOकडून स्पष्टीकरण

Akkha Masoor recipe: उसळ खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा अख्खा मसूरची झणझणीत सुकी भाजी

SCROLL FOR NEXT