Gold Rate Today saam tv
बिझनेस

सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेट सोन्याचा भाव किती? पाहा लेटेस्ट दर

Latest Gold Rates: रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे. गोपाळष्टमीच्या दिवशी २४ कॅरेट सोनं ६०० रुपयांनी स्वस्त झाले. चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे.

Bhagyashree Kamble

  • रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे.

  • गोपाळष्टमीच्या दिवशी २४ कॅरेट सोनं ६०० रुपयांनी स्वस्त झाले.

  • चांदीच्या दरात मात्र वाढ झाली असून १ किलो चांदीचा दर १,१६,२०० रुपये झाला आहे.

  • सोन्याच्या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, पण चांदी खरेदी महागली आहे.

सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरात सातत्यानं घट झाली आहे. अशातच गोपाळष्टमीलाही सोन्याच्या दरात घट झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात ६०० रूपयांची घट झाली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे निश्चितच ग्राहकांना दिलासा मिळेल. जाणून घेऊयात आजचे दर.

दहीहंडीच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात ६० रूपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅमसाठी तुम्हाला १,०१,१८० रूपये मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोनं ६०० रूपयांनी घसरले आहे. १० तोळं सोन्याचा दर १०,११,८०० इतका आहे.

२२ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात ५० रूपयांची घट झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोनं खरेदीसाठी तुम्हाला ९२,७५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १० तोळं सोनं ५०० रूपयांनी स्वस्त झाले आहे. १० तोळं सोन्याचा दर ९,२७,५०० रूपयांनी स्वस्त झाले आहे.

१८ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात ४० रूपयांची घट झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला ७५,८९० रूपये मोजावे लागतील. १८ कॅरेट १० तोळं सोनं ४०० रूपयांनी स्वस्त झाले आहे. १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा दर ७,५८,९०० रूपये इतका आहे.

सोन्याच्या दरात घट जरी झाली असली तरी, चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. १ ग्रॅम चांदी ११६ रूपयांनी महागले आहे. १ किलो चांदीचा दर १,१६,२०० रूपये इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT