सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या १० दिवसांत २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा दर तब्बल ४८,३०० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्याची ही सुवर्णसंधी आहे. ८ मे ते १८ मे या कालावधीत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९९,६०० रुपयांवरून ९५,१३० रुपयांवर आले आहे. त्यामुळे १० तोळं सोन्याच्या दरात साधारणता ४८,३०० रुपयांनी घसरण झाली आहे. आजचा सोन्याचा सोन्याचा भाव किती आहे ते आपण जाणून घेणार आहोत...
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ९५,१३० रुपये आणि १०० ग्रॅम सोन्याचे दर ९,५१,३०० रुपये होते. तर २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी ८७,२०० रुपये आणि प्रति १०० ग्रॅमसाठी ८,७२,००० रुपये इतके होते. १० दिवसांपूर्वी म्हणदे ८ मे रोजी, २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ९९,६०० रुपये आणि प्रति १०० ग्रॅमचा भाव ९,९६,००० रुपये होता. तर २२ कॅरेटच्या सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९१,३०० रुपये आणि प्रति १०० ग्रॅम ९,१३,००० रुपये होता. मे महिन्यातील सोन्याच्या किमतींसाठी हा सर्वोच्च स्तर असल्याचे म्हटले जात आहे.
८ मे ते १८ मे या कालावधीत, २४ कॅरेटमध्ये १०० ग्रॅम सोन्याच्या किमतीत ४४,७०० रुपयांची घसरण झाली, तर २२ कॅरेटमध्ये १०० ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये ४१,००० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ४,४७० रुपये आणि २२ कॅरेटमध्ये १० ग्रॅम सोन्याचे दर ४,१०० रुपयांनी कमी झाले आहेत.
१९ मे म्हणजे आज भारतात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ९५,५१० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८७,५५० आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७१,६३० रुपये इतका आहे. आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम ९६.९० आणि प्रति किलोग्रॅम ९६,९०० रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर वाढले आहे.
१ ग्रॅम - ९,५५१ रुपये
१० ग्रॅम- ९५,५१० रुपये
१०० ग्रॅम- ९,५५,१०० रुपये
१ ग्रॅम - ८,७५५ रुपये
१० ग्रॅम - ८७,५५० रुपये
१०० ग्रॅम- ८,७५,५०० रुपये
१ ग्रॅम - ७,१६३ रुपये
१० ग्रॅम - ७१,६३० रुपये
१०० ग्रॅम - ७,१६,३०० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.