Gold Price Today Saam Tv News
बिझनेस

Gold Price Today : मुंबई-पुण्यात सोन्याच्या किंमतीत झाली घसरण, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Gold price today India 24K 22K 18K per gram latest update : आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.२५% कपात केल्यानंतर मुंबई-पुण्यात सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर आज स्थिर असून चांदीचा भाव बदललेला नाही.

Namdeo Kumbhar

Gold Price Today; 7 Dec 2025 check todays 18k 22k and 24k Gold Rates Mumbai Pune : आरबीआयने शुक्रवारी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपात केली. याचा परिणाम सराफा बाजारात सोनं अन् चांदीच्या किंमतीवर झाला. शनिवारी सोन्याच्या किंमतीत कपात झाली तर चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. रविवारी सोनं अन् चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. रविवार असल्याने मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बंद असते. त्यामुळे वायदा बाजारात सोनं अन् चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

देशात सोनं अन् चांदीचे दर Gold Price In India Today

देशांतर्गत सराफा बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १३०१५ रूपये इतका होता, यामध्ये कोणताही बदल झाला नसून दर तेच आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम 11,930 रूपये इतकी तर १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ९७६१ रूपये इतकी आहे.

प्रति तोळा २४ कॅरेट सोन्याची किंमत १३९१५० रूपये इतकी आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ११९३०० रूपये इतकी आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ९७६१० इतकी झाली.

आठवड्यात किती महाग झालं सोनं ?

भारतात सोन्याच्या किमतीत आठवड्याला वाढ होत आहे. एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याने ३३० रुपयांची वाढ झाली. २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत ३०० रुपयांची वाढ झाली आहे. ७ डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३०,३०० रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट प्राईस प्रति औंस $४,२२३.७६ आहे.

देशात चांदीचे दर किती ? (Silver Price In India)

देशात चांदीचे किंमत प्रति किलो १९०००० रूपये इतकी आहे. आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. शनिवारचे दर कायम आहेत. एका आठवड्यात चांदीचा भाव ५,००० रुपयांनी वाढला आहे.

प्रमुख शहरातील सोन्याचे आजचे दर काय ?

राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेॉट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १३०३० रूपये इतकी झाली. २२ कॅरेट सोन्याची किंमत ११९४५ तर १८ कॅरेट सोन्याची किममत ९७७६ इतकी झाली. चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १३,१३५ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,०४० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १०,०४० रुपये आहे. पुणे, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि केरळमध्ये किंमती समान आहेत. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १३,०१५ रुपये, २२ कॅरेट सोन्याची किंमत ११,९३० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ९,७६१ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT