gold price today in india 24k 22k 18k : इराण-इस्त्राइल युद्धाचा परिणाम जागतिक बाजारावर होत असतानाच सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली नाही. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. प्रति तोळा सोन्याची किंमत १०३० रूपयांनी घसरली आहे. एकीकडे कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याने महागाईचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी झाली. त्यामुळेच देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्याचे बोलले जात आहे.
भारतातील सोन्याचा दर
आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,९६६ रुपये इतका आहे. शुक्रवारच्या तुलनेत ही किंमत १०३ रुपयांनी घसरली आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ९५ रूपये प्रति ग्रॅमने घसरून १४,६३५ रुपये इतकी झाली आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ११,९७४ रुपये इतका आहे. शुक्रवारच्या तुलनेत यामध्ये ७८ रूपयांची कपात नोंदवण्यात आली आहे. शनिवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर
भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,५९,६६० रुपये इतकी झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत यामध्ये १,०३० रुपये कपात झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९५० रूपयांनी घसरून १,४६,३५० रूपये झाले आहेत. १८ कॅरेट सोन्याच्या दरातही प्रति तोळा ७८० रूपयांची कपात झाली आहे. आज सराफा बाजारात १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ११९७४० रूपये इतकी झाली आहे.
मुंबई-पुण्यात सोन्याची किंमत किती?
दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹१६०,८३० आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१४७,४४० आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १४७२९० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १६०६८० रुपये आहे. पुणे आणि बेंगळुरूमधील या दोन्ही शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १६०६८० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर तोळा १० ग्रॅम १४७२९० रुपये आहे.
चांदीची किंमत घसरली -
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही गेल्या काही दिवसांपासून कपात नोंदवण्यात येत आहे. आज सराफा बाजार उघडताच चांदीच्या दरात घसरण नोंदवली. चांदीची किंमत प्रति किलो २,७९,८०० रुपये इतकी झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत यामध्ये ११००० रूपयांची कपात नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची स्पॉट किंमत प्रति औंस $८३.१४ आहे. या वर्षी जानेवारीमध्ये चांदीची किंमत ४ लाख रुपयांच्या पुढे गेली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.