Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate : सोनं स्वस्त झालं की महागलं? वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळतायत. आजच्या दिवशी देखील सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आजच्या दिवशी तुम्ही जर सोनं खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला सोनं महाग पडू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सतत बदल पाहायला मिळतोय. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जातेय. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी वाढल्याने ग्राहकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.

मनी कंट्रोल वेबसाईटच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम फक्त १० रुपयांनी महाग झाल्याची माहिती आहे. तर एक दिवस आधी म्हणजे काल सोन्याची किंमत २२०० रुपयांनी वाढली होती. याशिवाय आज सलग दुसऱ्या दिवशी एक किलो चांदी महाग झालीये. चांदीची किंमत 10 रुपयांनी वाढली आहे.

प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव

दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७५८० रुपये आहे. याशिवाय २२ कॅरेटची किंमत प्रति १० ग्रॅम ८९४६० रुपये आहे. कोलकाता, चेन्नई आणि मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९३१० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७४३० रुपये असल्याची माहिती आहे.

जयपूर आणि अहमदाबादमध्ये काय आहे सोन्याचा दर?

आजच्या दिवशी अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९३६० रुपये आहे. तर तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७४८० रुपये आहे. याशिवाय जयपूरमध्ये २२ कॅरेट सोनं ८९४६० रुपये आणि २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ९७५८० रुपये असल्याची माहिती आहे.

चांदीचा दर काय आहे?

दिल्लीमध्ये सलग दोन दिवसांत चांदीच्या किमतीत प्रति किलो ३१०० रुपयांची वाढ झाली आहे. आज २२ मे रोजी दिल्लीत चांदी १,००,१०० रुपये प्रति किलो दराने विकण्यात येतेय. तर मुंबई आणि कोलकातामध्ये चांदीची किंमत समान दराने विकली जातेय. चेन्नईमध्ये चांदीची किंमत १,११,१०० रुपये प्रति किलो असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT