ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, लोक त्यांच्या रुटीनमध्ये अनेक प्रकारचे आरोग्यदायी पेयांचा समावेश करतात.
असेच एक पेय म्हणजे काकडी-पुदिन्याचे पेय, हे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
काकडी शरीराला हायड्रेट ठेवते आणि ऊर्जा प्रदान करते. पुदिना वजन कमी करण्यास मदत करतो आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करतो.
एक काकडी चिरुन एक लीटर पाण्यात मिक्स करा.
यानंतर, यामध्ये एक कप पुदिन्याचे पाने मिसळा.
यानंतर तुम्ही त्यात लिंबू किंवा आल्याचा रस देखील घालू शकता आणि नंतर ते फ्रीजरमध्ये 2 तासांसाठी ठेवू शकता.
या पेयामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.