ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कान आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील अवयव आहे.
कानातील पडदा फाटल्यास आयुष्यभरासाठी बहिरेपणा येऊ शकतो.
अनेकांना कानातील मळ साफ करण्यासाठी माचिसची काडी वापरण्याची सवय असते. परंतु तुम्हाला माहितीये का, यामुळे कानाचे गंभीर नुकसान होऊ शकते.
कानामध्ये माचिसची काडी घातल्याने ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि बहिरेपणा येऊ शकतो.
माचिसच्या काडीचा तुकडा कानात राहिल्यास इन्फेक्शन होऊ शकतो.तसेच कानात पू जमा होऊ शकतो.
कानामध्ये एक अत्यंत नाजूक हाड असते. जे माचिसच्या काडीने देखील मोडले जाऊ शकते आणि बहिरेपणा येऊ शकतो.
कानातील मळ साफ करण्यासाठी सतत माचिसच्या काडीचा वापर केल्यास कानात तीव्र वेदना होऊ शकतात.