ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणे आहेत. माथेरान, महाबळेश्वर आणि लोणावळा सारखे ठिकाणं तुमच्या मनाला भुरळ घालतील.
मुंबई आणि पुणेपासून हाकेच्या अंतरावर असलेले खंडाळा हिल स्टेशनला या पावसाळ्यात भेट द्यायला विसरु नका. येथील हिरवेगार डोंगर, कोसळणारे धबधबे,धुक्यांची पसरलेली चादर आणि शांत वातावरण तुमचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करतील.
टायगर्स लीप हे खंडाळामधील प्रसिद्ध पॉईंट आहे. येथून तुम्ही निसर्गाच्या विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
जर तुम्हाला शांत आणि सुंदर ठिकाणी निवांत वेळ घालवायचा आहे तर या ठिकाणी भेट द्यायला विसरु नका.
खंडाळा घाटाच्या सुरुवातीलाच अमृतांजन पॉईंट आहे. येथून तुम्ही खोल दऱ्या, हिरवेगार डोंगर आणि निसर्गाच्या विहंगम दृश्याचा आनंद घेऊ शकता.
विसापूर किल्ला हा खंडाळामधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. नैसर्गिक सुदंरताने नटलेल्या या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगला जाऊ शकता.
महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक धबधबा म्हणजे कुणे धबधबा. पिकनिकसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.