Gold Price Today  Saam Tv
बिझनेस

Gold price today : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! आज सोन्याच्या दरात वाढ; पाहा 24K, 22K आणि 18K चे ताजे भाव

gold rate today : आज भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५५,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही वाढले आहेत.

Namdeo Kumbhar

भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. शनिवारी सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,४२० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे भाव १,५५,८४० रुपयांवर पोहोचला आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक मागणीतील वाढ यामुळे २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा सर्वच प्रकारच्या सोन्याच्या किमती उंचावल्या आहेत.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा सर्वच प्रकारच्या सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून खरेदीदारांच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे. शुद्ध सोन्याचा विचार केला तर आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,४२० रुपयांची वाढ झाली असून भाव १,५५,८४० रुपयांवर पोहोचले आहेत. आज १ ग्रॅम सोन्याची किंमत १४२ रुपयांच्या वाढीसह १५,५८४ रुपये झाली आहे. तर ८ ग्रॅमचा भाव १,२४,६७२ रुपये (+१,१३६ रुपये) आणि १०० ग्रॅम सोन्याचा भाव १५,५८,४०० रुपये (+१४,२०० रुपये) इतका झाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,३०० रुपयांची वाढ झाली असून आजचा दर १,४२,८५० रुपयांवर गेला आहे. आज १ ग्रॅम २२ कॅरेट सोने १४,२८५ रुपयांना (+१३० रुपये) मिळत आहे. तसेच ८ ग्रॅमसाठी १,१४,२८० रुपये (+१,०४० रुपये) आणि १०० ग्रॅमसाठी १४,२८,५०० रुपये (+१३,००० रुपये) मोजावे लागत आहेत.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

हलक्या आणि डिझायनर दागिन्यांसाठी मागणी असलेल्या १८ कॅरेट सोन्याच्या किमतीतही प्रति १० ग्रॅम १,०६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १८ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचा भाव १,१६,८८० रुपये झाला आहे. तर १ ग्रॅमचा भाव ११,६८८ रुपये (+१०६ रुपये), ८ ग्रॅमचा भाव ९३,५०४ रुपये (+८४८ रुपये) आणि १०० ग्रॅमचा भाव ११,६८,८०० रुपये (+१०,६०० रुपये) इतका नोंदवला गेला आहे.

जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक मागणीतील वाढ यामुळे सोन्याच्या दरात ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदीपूर्वी स्थानिक सराफ दुकानातील ताजे दर नक्की तपासून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT