Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price: दसऱ्यापूर्वी सोन्याने भाव खाल्ला! १० तोळा सोन्याच्या दरात ९२०० रुपयांनी वाढ, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. दसऱ्यापूर्वी सोन्याचे दर कमी होतील अशी आशा सर्वांना होती पण सोन्याचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आज १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली.

  • आज १० तोळा सोनं ९२०० रुपयांनी महाग झाले.

  • २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १,१६,४०० रुपये आणि २२ कॅरेट सोनं १,०६,७०० रुपये झाले आहे.

  • १८ कॅरेट सोन्याच्याही दरात ६९० रुपयांची वाढ झाली आहे

सोनं-चांदी खरेदी करणऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दरात आजही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. आज २४ कॅरटचे १० तोळा सोनं ९२०० रुपयांनी महागले आहे. त्यामुळे दसऱ्यासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत हे जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ९२० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,१६,४०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ९२०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,६४,००० रुपये मोजावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,०६,७०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दर ८५०० रुपयांनी वाढले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १०,६७,००० रुपये मोजावे लागणार आहेत. आधी या सोन्याचे दर १०,५८,५०० रुपये इतके होते.

तर आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झालेली दिसत आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ६९० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८७,३०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ६९०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८,७३,००० रुपये मोजावे लागतील. हेच सोनं शनिवारी ८,६६,१०० रुपयांनी विकले गेले.

दरम्यान, आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज एक ग्राम चांदीच्या दरात १ रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला आज १५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १००० रुपयांनी वाढ झाली आहे. हीचांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,५०,००० रुपये खर्च करावे लागतील. सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar Collection : जगभरात 'धुरंधर'ची धूम; दुसऱ्या दिवशी मोडला मोठा रेकॉर्ड, रणवीर सिंहच्या चित्रपटाने किती कमावले?

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

Shocking : संतापजनक! शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; नोट्स आणि प्रॅक्टिकल मार्क देतो सांगून रूमवर नेलं अन्...

Tips For Regular Pooping: ऑफिसला निघण्याआधी पोट साफ न होत असल्यास काय कराल? तज्ज्ञ सांगतात उपाय

Shukra Gochar 2026: १०० वर्षांनी शुक्राच्या गोचरमुळे तयार होणार समसप्तक राजयोग; पैसे मिळवून 'या' राशी जगणार ऐशोआरामात आयुष्य

SCROLL FOR NEXT