Today's Gold Rate saam tv
बिझनेस

Gold Rate Today: ४ दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी उसळी; किमतीत तब्बल १२०० रुपयांची वाढ

Today's Gold Price: आज सोन्याचा भाव वाढला आहे. सलग काही दिवस सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानंतर आज त्यात वाढ पाहायला मिळतेय. काल सोन्याचा भाव एका महिन्यातील नीचांकी पातळीवर पोहोचला होता

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत घसरण होताना पाहायला मिळत होती. मात्र आज सलग चार दिवस सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानंतर सोन्याचा दर चांगलाच वाढला आहे. काल सोन्याचा भाव एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. आज १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत १२०० रुपयांची वाढ झाली आहे.

मनी कंट्रोलच्या बेवसाईटनुसार, आज म्हणजेच १६ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,२०० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,२०० रुपये आहे. शुक्रवारी १६ मे २०२५ रोजी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीचा भाव किती आहे ते जाणून घेऊया.

पुन्हा वाढला सोन्याचा भाव

चार दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या किमती आता गगनाला भिडल्या आहे. जगभरातील वातावरण थोडं शांत झालं असून अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत घसरण झाली. मात्र आज सोन्याचा भाव वाढला आहे. आता लोक सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी शेअर बाजारासारखे पर्याय पसंत करतायत.

रशिया-युक्रेन युद्धात शांतीची आशा आणि भारत-पाकिस्तानमधील तणाव संपल्याच्या बातमीचाही सोन्याच्या मागणीवर परिणाम झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय डॉलरच्या किमतीत वाढ आणि शेअर बाजारातील तेजीमुळे सोन्याची चमकही कमी झाली होती. मात्र आता काही दिवसांच्या घसरणीनंतर हा ट्रेंड पुन्हा वाढतोय.

दिल्ली आणि मुंबईमध्ये कसा आहे सोन्याचा भाव?

आज शुक्रवारी म्हणजेच १६ मे रोजी दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ८७,३५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,२८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. याशिवाय मुंबईसारख्या शहरात २२ कॅरेट सोन्याचा भाव ८६,१०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ही ९५,१३० रुपये प्रति १० ग्रॅम असल्याची माहिती आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर

  • दिल्ली-८७,३५०

  • चेन्नई-८७,२००

  • मुंबई-८७,२००

  • कोलकाता-८७,२००

  • जयपूर-८७,३५०

  • नोएडा-८७,३५०

२४ कॅरेट सोन्याचा दर

  • दिल्ली-९५,२८०

  • चेन्नई-९५,१३०

  • मुंबई-९५,१३०

  • कोलकाता-९५,१३०

  • जयपूर-९५,२८०

  • नोएडा-९५,२८०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे - रुपाली पाटील

Crime: शरीरसंबंध ठेवताना बायकोनं नवऱ्याचा गळा चिरला; मृतदेहाजवळच भाच्यासोबत केले अश्लील कृत्य

Deputy CM Maharashtra: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्रा पवार सक्रिय;'या' जिल्ह्याचा करणार दौरा

SCROLL FOR NEXT