Gold Price Saam Tv
बिझनेस

Gold Price : सोनं भडकलं, गुढी पाडव्याच्या दोन दिवस आधीच १५०० रुपयांनी वाढलं, पाहा नवे दर

Gold Price News : दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये सोन्याच्या किमती घसरल्या होत्या. पण आज अचानक त्यात दीड हजारांची वाढ झाल्याने सोन्याची खरेदी करणाऱ्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.

Yash Shirke

संजय महाजन, साम टीव्ही, प्रतिनिधी

जळगाव: आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीचे भाव घसरले होते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करु असा अनेकांचा मानस होता. पण अचानक सोने चांदीच्या दरात भाववाढ झाली आहे. त्यामुळे सणावराला खरेदी करण्याची तयारी दाखवणाऱ्या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात १,५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये सोन्याचे दर ८८ हजार रुपये इतके होते. आज अचानक या दरात पंधराशे रुपयांनी वाढ झाली. सोन्याचा आजचा दर ८९ हजार ३०० रुपयांवर पोहोचला आहे. हाच दर जीएसटीसह ९२ हजार रुपयांपर्यंत गेल्याने जळगावमध्ये ग्राहकांचा सोनेखरेदीला काहीसा कमी प्रतिसाद दिसून आला होता.

२ एप्रिल रोजी ट्रारिफ रेट लागू होणार आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे अशी माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली आहे. ३० मार्च रोजी गुढीपाडवा आहे. या निमित्ताने अनेकजण सोन्याची खरेदी करतात. पण सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दुकानांमधील गर्दी कमी झाल्याचे म्हटले जात आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

- २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,355 रुपयांना मिळेल.

- २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,840 मिळेल.

- १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,550 एवढा आहे.

- तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,35,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

- २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,11,300 रुपये किंमतीने विकतंय.

- १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 91,130 रुपये इतका आहे.

- ८ ग्रॅम सोनं आज 72,904 रुपये इतका आहे.

- १ ग्रॅम सोनं 9,113 रुपयांनी विकलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT