Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Comparison: १ Kg सोन्याच्या किंमतीत खासगी विमान, प्रसिद्ध बिझनेसमनच्या पोस्टने भुवया उंचावल्या, पाहा नेमकं गणित मांडलं कसं?

Harsh Goenka Post on Gold Rate Hike: उद्योगपती हर्ष गोयनका यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, २०४० मध्ये तुम्ही १ किलो सोन्याच्या दरात प्रायव्हेट जेट खरेदी करु शकतात.

Siddhi Hande

सध्या सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सतत सोन्याचे दर वाढत असल्याने मात्र ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. दरम्यान, नुकतेच उद्योगपती हर्ष गोयनका यांनी सोन्याच्या किंमतीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.त्यांनी सांगितलंय की ९०च्या दशकात १ किलो सोन्याच्या दरात कार खरेदी करायचो. दरम्यान, आता या किंमतीत कोणती कार खरेदी करता येणार याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

हर्ष गोयनका यांची पोस्ट (Harsh Goenka Post)

हर्ष गोयनका यांनी सांगितले की, सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर २०३० पर्यंत १ किलो सोन्याच्या दरात तुम्ही रोल्स रॉयस कार खरेदी करु शकतात. त्यांनी सांगितले की, १९९० मध्ये १ किलो सोन्याच्या दरात मारुती 800 खऱेदी करु शकत होते. २००० मध्ये १ किलो सोन्याच्या दरात एस्टीम खरेदी करु शकत होते. २००५ मध्ये इनोव्हा, २०१० मध्ये फॉर्च्युनर खरेदी शकत होते. २०१९मध्ये १ किलो सोन्याच्या दरात बीएमडब्लयू खरेदी करु शकतात. २०२५ मध्ये १ किलो सोन्याच्या दरात लँड रोवर खरेदी करु शकतो. त्यामुळे १ किलो सोने तुम्ही सांभाळून ठेवा. २०३० मध्ये याची किंमत रोल्स रॉयस कारएवढी होईल. तर २०४० मध्ये तुम्ही कदाचित प्रायव्हेट जेटदेखील खरेदी करु शकतात.

सोन्याचे दर खूप जास्त वाढत आहेत. पुढे भविष्यातही हे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योजक हर्ष गोयनका यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. परंतु सध्या सोन्याचे दर खूप जास्त वाढले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayushman Bharat card: घर बसल्या कसं काढू शकता आयुष्मान भारत कार्ड

Court : कोर्टात सरकारी वकिलाला मारहाण! थेट चेंबरमध्ये घुसून बेदम मारलं, बूट फेकून मारला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरेगावी आगमन

BMC Election Explainer : मुंबईत ठाकरेंचीच सरशी? महायुतीचं टेन्शन वाढलं; ७० वॉर्ड निर्णायक, राज ठाकरे किंगमेकर ठरणार?

सिल्की आणि शाईनी केसांसाठी आता घरच्या घरी करा हेअर स्पा

SCROLL FOR NEXT