Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला, चांदीही महागली; तुमच्या भागात आजचा दर किती?

Gold and Silver Rates: जळगावमध्ये सोन्याचा दर जीएसटीसह १,३१,०० प्रति तोळा इतका आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.

Bhagyashree Kamble

  • सुवर्णनगरीत सोनं अन् चांदीच्या दरात वाढ.

  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात प्रचंड उलाढाल.

  • खरेदीदारांच्या खिशाला कात्री.

सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू आहे. प्रकाशमय सणानिमित्त आपण चमकणारे दागिने हमखास खरेदी करतो. मात्र, यंदा सणाच्या तोंडावर सोनं प्रचंड महागलं आहे. सोन्याच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे. जळगावच्या सुवर्णनगरीतही सोन्याच्या दरानं विक्रमी उसळी घेतली आहे. जीएसटीसह दर प्रतितोळा तब्बल १,३१,००० वर पोहोचला आहे. केवळ एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ४००० रूपयांची झेप पाहायला मिळाली आहे.

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीचा दर १,९६,००० प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे चांदीही लवकरच दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचेल. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सोनं आणि चांदी महागल्यामुळे सामान्यांच्या खिशाला नक्कीच कात्री बसणार, एवढं मात्र नक्की.

दिवाळी आणि धनत्रयोदशीपूर्वी सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सराफाच्या दुकानात मोठी गर्दी केली आहे. वाढत्या सोन्याच्या दरवाढीमुळे अनेक ग्राहकांनी दिवाळीची खरेदी आगोदरच उरकून घेतली आहे. शहरातील सराफ बाजारात आज दिवसभर प्रचंड उलाढाल झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

यु.एस.–चायना ट्रेड वॉर, तसेच जागतिक भू-राजकीय तणाव या घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरावर होताना दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात आजचे दर जीएसटीसह सोने १,३१,००० प्रति तोळा तर चांदी १,९६,००० प्रति किलो वर आहे. सोन्याच्या दरातील या विक्रमी वाढीमुळे जळगावच्या सुवर्णनगरीत पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेल एक्स्टेंशन करताना 'या' गोष्टींची अवश्य काळजी घ्यावी

Maharashtra Live News Update: 11 हजार दिव्यांनी लखलखला अंबड येथील मत्स्योदरी देवीचा परिसर,दीपोत्सवासाठी परदेशी पाहुण्याची हजेरी

J J Hospital Mumbai: डॉक्टर महिलेला अपमानास्पद वागणूक; राज्य महिला आयोगाची सर जे जे समूह रुग्णालयावर कारवाई

नाद करा, पण 'बिजल्या'चा कुठं! शेतकऱ्यानं ११ लाखांना बैल विकला; घोड्यालाही घाम फोडणाऱ्या बिजल्याचा खुराक जाणून थक्क व्हाल

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं?

SCROLL FOR NEXT