Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला! १० तोळाच्या दरात ७१०० रुपयांची वाढ, २२-२४ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीचे नवे दर लागू झाले आहेत. सोनं आणि चांदीचे दर आज पुन्हा वाढले आहेत. सोन्याच्या १० तोळाच्या दरात ७१०० रुपयांची वाढ झाली आहे. आजचे २२-२४ कॅरेटचे दर किती वाचा...

Priya More

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याने आज पुन्हा भाव खाल्ला असून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० तोळा ७१०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करताना आता तुम्हाला खूपच जास्त पैसे मोजावे लागणार आहे.आज सोनं किंवा चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटचे देर किती आहेत ते जाणून घ्या.

गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ७१० रुपयांनी वाढ झाली असून या सोन्याची किंमत ९९,७१० रुपयांवर पोहचले आहे. जीएसटीसह हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळेा सोन्याच्या दरामध्ये ७,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,९७,१०० रुपये खर्च करावे लागतील.

तर, आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ६५० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९१,४०० रुपये खर्च करावे लागतील. तर आज २२ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,१४,००० रुपये मोजावे लागतील. त्याचसोबत, तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ५४० रुपयांनी वाढ झाली असून आज हे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७४,७९० रुपये खर्च करावे लागतील. तर १० तोळे खरेदी करण्यासाठी ७,४७,९०० रुपये द्यावे लागतील.

तर देशात आज सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज एक ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅममध्ये ४० तर १०० ग्रॅम चांदीच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीच्या दरात ४००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,१५,००० रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे चांदी खरेदी करताना देखील तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Kabootar Khana: वीज कापली, खोली पाडली, जाळी लावण्याचे काम सुरू; दादरचा कबूतरखाना बंद करणार|VIDEO

Maharashtra Live News Update : मुंबईत भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन

Ind vs Eng : ओव्हल कसोटीमध्ये राडा! एकटा यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला, मैदानात काय घडलं? Video

Family Pension म्हणजे काय रं दादा ? कोणाला मिळतो लाभ? जाणून घ्या सर्व काही

Manikrao Kokate: विधानभवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर बच्चू कडूंचा प्रहार|VIDEO

SCROLL FOR NEXT