Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Price :सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold and silver prices : सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १३० रुपयांनी स्वस्त झालं असून चांदीचाही भाव कमी झाला आहे. सोनं खरेदी करणारांसाठी ही उत्तम संधी मानली जातेय.

Namdeo Kumbhar

Gold Price Today : सोनं आणि चांदीची खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सराफा बाजार उघडताच चांदी आणि सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १३० रूपयांनी घसरलेय. प्रति १० तोळं सोनं एक हजार रूपयांपेक्षा जास्त स्वस्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या किंमतीमुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे समजतेय. आज चांदी देखील स्वस्त झाली आहे.

सोने आणि चांदीच्या किंमतीत सध्या बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे सोन्याचे दर काही शहरांमध्ये स्थिर, तर काही ठिकाणी थोडे वाढलेले दिसत आहेत. आज सराफा बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 99,760 रुपये इतका झाला. मंगळवारी हा भाव 99,890 रुपये होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 91,440 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 74,820 रुपये आहे. चांदीचा भाव प्रति किलो 1,14,900 रुपये आहे.

कोणत्या शहरात किती किंमत ?

राजधानी दिल्ली :

२४ कॅरेट सोने: ₹९९,९१०

२२ कॅरेट सोने: ₹९१,५९०

१८ कॅरेट सोने: ₹७४,९४०

मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू :

२४ कॅरेट सोने: ₹९९,७६०

२२ कॅरेट सोने: ₹९१,४४०

१८ कॅरेट सोने: ₹७४,८२०

सोन्याचे दर कसे ठरवले जातात ?

सोने आणि चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींवर आधारित असतात. भारतात IBJA आणि स्थानिक सराफा बाजार यांच्या आधारावर दर जाहीर केले जातात. सोने आणि चांदीच्या किंमती दररोज बदलतात आणि त्या ठरविण्यासाठी अनेक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. या किंमतींवर आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम होतो. जागतिक बाजारात अनिश्चितता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारापासून दूर राहून सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांचा आधार घेतात, त्यावेळी सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसून येते. डॉलरचे मूल्य कमी झाले, तर सोन्याचे दर वाढतात. रुपया कमकुवत झाला, तर सोन्याचे दर वाढतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT