tenant legal rights for security deposit refund  साम टीव्ही मराठी
बिझनेस

घरमालक डिपॉझिट काही केल्या परत देत नाही, काय करावे? जाणून घ्या भाडेकरूंचे कायदेशीर अधिकार

security deposit not returned by landlord : घरमालक डिपॉझिट परत देत नसेल किंवा रंगकाम-दुरुस्तीच्या नावाखाली रक्कम कापत असेल तर भाडेकरूंचे कायदेशीर अधिकार काय आहेत? जाणून घ्या डिपॉझिट परत मिळवण्याचे नियम आणि उपाय.

Namdeo Kumbhar

tenant legal rights for security deposit refund : किरकोळ कारणांवरून, घराचा रंग केला, डागडुजीच्या नावाखाली घरमालक अनेकदा भाडेकरूंचे डिपॉझिट (Security Deposit) देत नाही किंवा त्यातील रक्कम कट करतो. घर खाली करताना “भिंतीचा रंग उडाला आहे” किंवा “हे काम करायचे आहे” अशी कारणे सांगून पैसे कापले जातात किंवा महिना न् महिना चकरा मारायला लावल्या जातात. पण जर तुम्ही वेळेवर भाडे भरले असेल, वीज-पाण्याचे बिल थकवले नसेल आणि घराचे कोणतेही मोठे नुकसान केले नसेल, तर घरमालकाला तुमचे डिपॉझिट अडकवण्याचा कोणताही अधिकार नाही.

पण तुम्हाला माहिती आहे का? कायद्यानुसार घरमालक आपल्या मर्जीने डिपॉझिट अडकवू शकत नाही. जर तुमचा घरमालक पैसे देण्यास नकार देत असेल, तर भाडेकरू म्हणून तुमच्याकडे कोणते अधिकार आहेत आणि कायदेशीररीत्या तुम्ही काय पावले उचलू शकता, हे सोप्या शब्दात जाणून घ्या.

वारंवार मागूणही डिपॉझिट परत मिळत नसेल तर सर्वात आधी घरमालकाशी चर्चा करा. तरीही तो पैसे देत नसेल, तर वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवा. यामुळे बहुतांश वेळा प्रकरण न्यायालयात जाण्यापूर्वीच सुटते. नवीन भाडे कायद्यानुसार (Model Tenancy Act) भाडेकरू रेंट अथॉरिटी किंवा रेंट ट्रिब्युनलमध्ये (Rent Tribunal) घरमालकाविरुद्ध तक्रार दाखल करू शकतात.

डिपॉझिटमधून किती पैसे वजा केले जाऊ शकतात, हे भाडे करारात (Rent Agreement) स्पष्ट लिहिलेले असणे गरजेचे असते. करारात उल्लेख नसल्यास घरमालक परस्पर पैसे कापून घेऊ शकत नाही. भाडे करार करताना सर्व गोष्टींचा उल्लेख करा.

घरमालक किती डिपॉझिट मागू शकतो?

केंद्रीय 'मॉडेल टेन्सी अॅक्ट'नुसार, घरमालक निवासी घरासाठी जास्तीत जास्त २ महिन्यांच्या भाड्याएवढेच सिक्युरिटी डिपॉझिट मागू शकतो. दुकान किंवा ऑफिससाठी जास्तीत जास्त ६ महिन्यांचे डिपॉझिट मागण्याचा नियम आहे.

घरमालक कोणती कागदपत्रे मागू शकतो?

भाड्याने घर देताना सुरक्षिततेच्या दृष्टीने घरमालक भाडेकरूकडून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट मागू शकतो. भाडेकरूचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. घर भाड्याने घेताना अथवा देताना नेहमी लिखित भाडे करार (Registered Rent Agreement) असावाच. डिपॉझिट दिल्याचा ऑनलाईन किंवा पावतीच्या (Receipt) स्वरूपात पुरावा नक्की जपून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pendant Chain Design: साध्या आणि सुंदर लूकसाठी ड्रेस किंवा साडीवर ट्राय करा ७ क्लासी पेंडंट चेन

लैंगिक अत्याचार प्रकरणातून काँग्रेस खासदाराची निर्दोष मुक्तता; हायकोर्टाचा निर्णय

HDFC Bank : रविवारी बँक सुरू राहणार HDFC बँकेने दिली मोठी अपडेट, वाचा कारण

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Mobile Password: मोबाईलचा पासवर्ड विसरलात? सर्विस सेंटरला न जाता ‘या’ सोप्या ट्रिकने घरीच करा अनलॉक

SCROLL FOR NEXT