Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: रिझर्व्ह बँकेतील नोकरी सांभाळून केली UPSC ची तयारी; चौथ्या प्रयत्नात यश; IAS यशनी नागराजन यांची यशोगाथा वाचा

Success Story Of IAS Yashni Nagrajan: आयएएस यशनी नागराजन यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी नोकरी करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवायचे असेल तर खूप मेहनत करावी लागते. अशीच मेहनत यशनी नागराजन यांनी केली. त्यांनी रिझर्व्ब बँकेतील फुल टाइम नोकरीसोबत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्या आज आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

यशनी नागराजन यांनी यूपीएससीच्या चौथ्या प्रयत्नात यश मिळवलं आहे. त्यांनी रोज ४-५ तास अभ्यास करुन हे यश मिळवलं आहे. यूपीएससी परीक्षेत २०१९ च्या बॅचमध्ये त्यांनी ५७वी रँक मिळवली. (Success Story Of IAS Yashni Nagrajan)

यशनी नागराजन यांच्या यशाचं श्रेय यांनी नोकरीसोबत यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, यूपीएससी क्रॅक करण्यासाठी तुम्हाला नोकरी सोडण्याची गरज नाही. फक्त स्मार्ट टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचे आहे. परीक्षेची तयारी आणि नोकरी या दोन्ही गोष्टी बॅलेंस करु शकता.

यशनी नागराजन यांनी अरुणाचल प्रदेशमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर युपिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये बीटेक केलं. यशनी या मूळच्या तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. त्या वडिलांच्या कामानिमित्त अरुणाचल प्रदेश येथे राहत होत्या. त्यांचे वडील इंजिनियर होते. तर आई हायकोर्टात सुपरिंटेंडेंट होती. (Success Story Of IAS)

यशनी नागराजन यांनी नोकरी करत रोज ४-५ तास अभ्यास केला. वीकेंडला पूर्ण दिवसभर त्यांनी अभ्यास केला. त्यांनी वीकेंडला सेल्फ स्टडी केली. त्यांना यूपीएससी परीक्षेत तीन वेळा अपयश आले परंतु त्यांनी हार मानली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

SCROLL FOR NEXT