Saam TV News
स्टार प्रवाहवर गाजलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'.
या मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसले ही तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या नेहमीच चर्चेत राहिली आहे.
रुपाली भोसले ही अभिनेत्री, मॉडेल आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातच आई कुठे काय करते या मालिकेमधून तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
रुपालीने एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमध्ये विविध भुमिका केल्या आहेत.
बडी दूर से आये है, तेनालीराम, कुलस्वामिनी आणि आयुष्यमान भव या मालिकांमध्ये रुपालीने तिचा ठसा उमठवला.
रुपाली भोसले ही मुंबईकर आहे. तिचा जन्म २९ डिसेंबर १९८३ रोजी झाला.
रुपालीचे बालपण मुंबईतल्या बीडीडी चाळीत गेले.
रुपाली भोसलेचे शिक्षण मुंबईतल्या सेंट थॉमस सेकेंडरी स्कूलमध्ये पुर्ण झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून तिने पदवी पुर्ण केली.