Ujjwala Yojana saam tv
बिझनेस

Free LPG : दिवाळीआधी महिलांसाठी मोठी खुशखबर! गॅस सिलिंडरचे पैसे थेट खात्यात जमा होणार

Ujjwala Yojana : उज्ज्वला योजनेच्या पात्र महिलांना दिवाळीत मोफत LPG सिलेंडरचा लाभ मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

गेल्या काही महिन्यात LPG सिलिंडरच्या दरात वाढ होताना पाहायला मिळाली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली. पण उत्तर प्रदेशातल्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या सणात गॅस सिलिंडरचा खर्च कमी करण्यासाठी योगी सरकारकडून मोफत LPG सिलिंडर योजनेचा लाभ दिला जातोय. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात सिलिंडरची रक्कम सबसिडीच्या स्वरुपात कमी केली जाणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

१.९ कोटी महिलांना मिळणार लाभ

उत्तर प्रदेश सरकारने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना होळी आणि दिवाळी अशा दोन सणांना मोफत LPG सिलिंडर रिफिल द्यायला मंजुरी दिल्याची माहिती आहे. यासाठी सरकारने २,१४२.७८ कोटी रुपयांची तरतूद केलीये. राज्यातल्या जवळपास १.९ कोटी महिला लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.

सिलिंडरचे पैसे खात्यात कसे येणार?

उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सर्वप्रथम इंडेन, भारत गॅस किंवा हिंदुस्तान पेट्रोलियमच्या माध्यमातून गॅस सिलिंडर बुक करावा लागेल. त्यानंतर सिलिंडरची डिलिव्हरी घेताना संपूर्ण पैसे भरावे लागतील. पुढे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.

केंद्र सरकारकडून उज्ज्वला लाभार्थ्यांना वर्षाला १२ सिलिंडरपर्यंत प्रत्येक रिफिलवर ३०० रुपये सबसिडी दिली जाते. याशिवाय उत्तर प्रदेश सरकारकडून होळी आणि दिवाळीसाठी स्वतंत्र लाभ दिला जातो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची कनेक्शनधारक असावी. गॅस कनेक्शनते ई-केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे. तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं. बँक खात्यात DBT सुविधा सुरू असावी. गॅल सिलिंडर बुकिंगची पावती जपून ठेवावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake : रात्री अचानक जमीन हादरली, भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra News Live Update : हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांवर उपाययोजना करा; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Diwali Faral : चकली, लाडूला द्या सुट्टी! यंदा दिवाळीत फराळात बनवा 'या' ७ हटके- चविष्ट रेसिपीज

Ramayana Advance Booking : दिवाळीत बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चा महाधमाका, पहिल्याच दिवशी जमवणार १०० कोटींचा गल्ला

एव्हरेस्टजवळ अपघात! दोन हेलिकॉप्टरची हवेतच समोरासमोर धडक; एका भारतीयाचा मृत्यू, थरारक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT