Fixed Deposit  Saam Tv
बिझनेस

Fixed Deposit मोडताय? या गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा होऊ शकते नुकसान

Fixed Deposit Scheme : भविष्यात आर्थिकदृष्ट्या कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यातील एक म्हणजे एफडी(Fixed Deposite). एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले व्याजदर मिळते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fixed Deposit Interest Rate:

सध्या सर्वजण आपल्या भविष्याची तरतूद करण्यावर भर देताना दिसत आहे. भविष्यात आर्थिकदृष्ट्या कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्टात गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना असतात. त्यातील एक म्हणजे एफडी(Fixed Deposite). यात गुंतणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. या योजनेला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना असेही म्हणतात.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना १,२,३ आणि ५ वर्षांसाठी असते. सध्या ५ वर्षांच्या ७.५ टक्के व्याजदर मिळते. त्यामुळे या योजनेचा भविष्यात खूप फायदो होतो. परंतु जर तुम्ही एफडी तोडायचा विचार करत असाल तर त्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

टाइम डिपॉझिटवर ५ वर्षांसाठी ७.५ टक्के, तीन वर्षांसाठी ७ टक्के व्याजदर तर एका वर्षासाठी ६.९ टक्के व्याजदर देण्यात येत आहे, या योजनेत तुम्हाला किमान १ हजार रुपये जमा करावे लागतील. तसेच या योजनेत तुम्ही कितीही अकाउंट उघडू शकतात. अकाउंट उघडताना लागू व्याजदर पूर्ण कालावधीवर असते. यात त्रिमाही चक्रवाढ पद्धतीने व्याज मोजले जाते आणि वर्षाच्या शेवटी ते खात्यात जमा होतात.

मुदतीच्या आधी एफडी मोडल्यास होऊ शकते नुकसान

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट तुम्हाला सहा महिने बंद करता येणार नाही. एका वर्षाच्या आत तुम्ही खाते बंद केल्यास तुम्हाला जमा रकमेवर व्याज मिळेल. ही रक्कम वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी असेल.

तुम्ही दर २, ३ किंवा ५ वर्षांचे एफडी अकाउंट ठरलेल्या कालावधीच्या आत बंद केले तर त्यातून २ टक्के रक्कम कापून घेतली जाईल. त्यामुळे नुकसान होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT