FD Interest Rates META AI
बिझनेस

FD Interest Rates : ज्येष्ठ नागरिकांची चांदी! FD वर मिळणार 7.85% व्याज; 11 ऑक्टोबरपासून नवे दर लागू

FinanceNews : श्रीराम फायनान्सने निवडक एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. 11 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू होतील. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विविध मुदतींच्या एफडीसाठीचे व्याजदर जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

FD Interest Rates: तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुदत ठेवीत (Fixed Deposit) गुंतवणूक करत असाल तर आता FD च्या नव्या नियमांबाबत तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. ११ ऑक्टोबरपासून FDचे दर बदलणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, ३६ ते ६० महिन्यांच्या मुदत ठेवींवर आता ७.८५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं. जेष्ठ नागरिक आणि महिलांनाही जास्तीच्या व्याजाचा लाभ मिळणार आहे.

कोणत्या मुदतीवर FDवर किती व्याज?

श्रीराम फायनान्सने १० कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी काही मुदतींचे व्याजदर वाढवले आहेत. नवीन दरांनुसार व्याजदर पुढीलप्रमाणे आहेत.

१२ महिन्यांची एफडी - आधी ६.८५ टक्के, आता ७.५० टक्के व्याज

१५ महिन्यांची डिजिटल एफडी - आधी ७.१० टक्के, आता ७.५० टक्के व्याज

१८ ते २३ महिन्यांची एफडी - आधी ७.०५, आता ७.२५ टक्के व्याज

२४ ते ३५ महिन्यांची एफडी - आधी ७.१० टक्के, आता ७.५० टक्के व्याज

२६ ते ६० महिन्यांची एफडी - आधी ७.५० टक्के, आता ७.८५ टक्के व्याज आहे. हे दर संबंधित अटी आणि एफडीच्या प्रकारानुसार लागू होतील. गुंतवणूक करण्याआधी कंपनीचं अधिकृत दरपत्रक तपासणं आवश्यक आहे.

जेष्ठ नागरिक आणि महिलांना अतिरिक्त व्याज

श्रीराम फायनान्सकडून जेष्ठ नागरिकांना नियमित व्याजाच्या दरापेक्षा ०.५० टक्के जास्त व्याज मिळू शकतं. तसेच महिलांना ०.०५ टक्के जास्त व्याज देण्याची तरतूद आहे. एफडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर पुन्हा गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना ०.१५ टक्के जास्त व्याजाचा लाभ मिळू शकतो. हे जास्तीचे लाभ संबंधित अटींनुसार लागू होतील.

एफडीमध्ये गुंतवणूक करण्याआधी काय लक्षात ठेवाल?

एफडीमध्ये ठरावीक कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने ठरलेल्या दरानुसार परतावा मिळतो. पण गुंतवणूक करण्याआधी व्याजदर, मुदतीआधी पैसे काढण्याचे नियम, कर आणि कंपनीची पतक्षमता याची माहिती घेतली पाहिजे. श्रीराम फायनान्स ही बँक नसून नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे. त्यामुळे तिच्या एफडीला बँक ठेवींप्रमाणे DICGC विमा संरक्षण आहे असं समजू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीत आंदोलनस्थळी पत्रकारांना ताब्यात घेतलं

Nitin Navin : ".....तर कारवाई होणार" भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा CJP आणि राहुल गांधी यांना इशारा

आधी हात जोडले अन् नंतर पोलिसांशी हुज्जत... दिपकेंसोबत विमानात काय घडलं? २.२१ मिनिटांचा थरारक व्हिडीओ

Navratri-October Heat : अनवाणी पाय अन् ऑक्टोबरचा तडाखा; नवरात्रीत 'अशी' घ्या काळजी, नाहीतर...

ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती रूपये येणार? नवीन अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT