FASTag Bank Change  meta ai
बिझनेस

FASTag चा आला नवीन नियम; वाहनधारकांना होणार 'हा' मोठा फायदा, पाहा तुमच्या कामाची बातमी

FASTag New Rule : आता FASTag जारी करणारी बँक बदलली तरी नवीन FASTag घेण्याची गरज नाही. NHAIच्या One Tag सुविधेमुळे सहभागी बँकेत FASTag पोर्ट करता येणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

FASTag वापरणाऱ्या वाहनमालकांसाठी केंद्र सरकारने मोठी आणि सोयीची सुविधा सुरू केली आहे. आतापर्यंत FASTag जारी करणाऱ्या बँकेच्या सेवेमध्ये अडचण आली किंवा ग्राहक दुसऱ्या बँकेकडे जायचा असेल तर नवीन FASTag घेण्याची प्रोसेस करावी लागत होती. मात्र आता ही अडचण दूर होणार असून, मोबाइल नंबर पोर्ट करण्याप्रमाणे FASTag सुद्धा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पोर्ट करता येणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘वन टॅग’फ्रेमवर्क सुरू केलं आहे. यामध्ये डझनभर प्रमुख बँकांचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक आणि Airtel Payments Bank यांसारख्या बँकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे सध्याच्या FASTag जारीसाठी बँकेच्या सेवेमुळे ग्राहक समाधानी नसेल, तर नवीन टॅग खरेदी न करता किंवा जुना टॅग बदलून न घेता सहभागी दुसऱ्या बँकेत आपला FASTag पोर्ट करता येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही प्रोसेस ‘राजमार्ग यात्रा’ या Appच्या माध्यमातून करता येईल असं सांगितलं आहे.

दरम्यान, टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक वाहनधारकांसाठी वार्षिक लोकल पास सुरू करण्याचीही तयारी सरकारकडून सुरू आहे. या पासची किंमत १,५०० रुपये असण्याचा अंदाज आहे. सध्या स्थानिक पास मासिक पद्धतीने दिले जातात.

FASTag मुळे राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीत मोठी वाढ झाली असून, ९८ टक्क्यांहून जास्त टोल कलेक्शन आता FASTag च्या मदतीने होत आहे. सरकारच्या मते, FASTag मुळे टोल उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ झाली असून ते ८२ हजार कोटी रुपयांहून जास्त झाले आहे.

तसेच मार्च २०२७ पर्यंत राष्ट्रीय महामार्गांवरचे सर्व टोल बूथ ‘बिना अवरोध’म्हणजेच अडथळामुक्त पद्धतीने कार्यरत करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे वाहनांची गर्दी आणि टोल प्लाझावर लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल. सरकारच्या अंदाजानुसार, FASTag आणि अडथळामुक्त टोल व्यवस्थेमुळे भविष्यात महसुलात आणखी हजारो कोटी रुपयांची वाढ होऊ शकते. तसेच वाहनधारकांच्या वेळेसोबतच इंधनाचीही मोठी बचत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर समुद्र दुर्घटना अत्यंत दुर्दैवी; समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची गरज

Best Foods For Kidney: दररोजच्या आहारात 9 गोष्टींचा करा समावेश, तुमची किडनी कधीच खराब होणार नाही!

Yuzvendra Chahal Retirement : भारतीय क्रिकेटपटूचा मोठा निर्णय! फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाचा मार्ग बदलला; आता कुठून निघणार, कुठे धडकणार?

प्रदीप पूर्णेकर हत्येपूर्वीच्या दोन दिवसांत काय घडलं? राम पूर्णेकरांच्या जबाबातून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT