FASTag Annual Pass च्या नियमांत बदल
नगरपालिका हद्दीबाहेरील पात्र टोल प्लाझासाठी वार्षिक शुल्क १५०० रुपये
नगरपालिका किंवा शहराच्या हद्दीतील पात्र टोल प्लाझासाठी ३००० रुपये शुल्क
कार, जीप आणि व्हॅनसारख्या खासगी वाहनांसाठीच ही सुविधा उपलब्ध
आजपासून FASTag Annual Pass बाबत नवे नियम लागू झाले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोलच्या वार्षिक पासच्या शुल्कात बदल केला असून, त्याचा फायदा टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या स्थानिक वाहनधारकांना होणार आहे. आता स्थानिक नागरिकांना १५०० आणि ३००० रुपयांत वर्षभरासाठी टोल पास काढता येणार आहे.
नव्या नियमानुसार, टोल प्लाझापासून 20 किलोमीटरच्या अंतरात राहणाऱ्या खासगी वाहनधारकांना हा पास मिळणार आहे. जर टोल प्लाझा नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीबाहेर असेल, तर वार्षिक पाससाठी १५०० रुपये द्यावे लागतील. तर टोल प्लाझा नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीत असेल, तर ३००० रुपये शुल्क भरावे लागेल. या पासमुळे स्थानिक नागरिकांना वारंवार टोलचे पैसे भरण्याची गरज पडणार नाही. सरकारकडून दरवर्षी १ एप्रिल रोजी या शुल्काचा आढावा घेतला जाणार आहे.
हा पास घेण्यासाठी वाहनधारकाचे घर टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या अंतरात असावे. तसेच वाहन खासगी वापरासाठी नोंदणीकृत असावे.याशिवाय वाहनावर वैध आणि सुरू असलेला FASTag असणे आवश्यक आहे. या पास फक्त कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या खासगी वाहनांनाच मिळणार आहे. यापासमुळे स्थानिक नागरिकांना एका वर्षात २०० वेळा टोल पार करता येणार आहे. एकाच टोल प्लाझावरून जाताना आणि परत येताना दोन वेळा टोल पार केल्याचे मोजले जाईल. हा पास फक्त संबंधित स्थानिक टोल प्लाझासाठीच लागू असेल.
व्यावसायिक वाहनांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. तसेच सर्व टोल प्लाझावर हा पास लागू नसेल. काही ठिकाणी टोल वसुलीची वेगळी व्यवस्था असल्यास किंवा टोलपर्यंत जाण्यासाठी पर्यायी रस्ता अथवा सर्व्हिस रोड उपलब्ध असल्यास स्थानिक पासची सुविधा मिळणार नाही. त्यामुळे वारंवार टोल भरणाऱ्या स्थानिक वाहनधारकांसाठी हा वार्षिक पास फायदेशीर ठरू शकतो. मात्र, मासिक पास आणि वार्षिक पास यांचा खर्च तपासूनच योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.