FASTag  Saam tv news
बिझनेस

FASTag KYC: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! आता FASTag केवायसीची झंझट संपली; १ फेब्रुवारीपासून नवीन नियम

FASTag KYC Rule Change: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांनी फास्टॅग केवायसी करणे अनिवार्य नसणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

Siddhi Hande

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

आता फास्टॅगसाठी केवायसी अनिवार्य नाही

१ फेब्रुवारीपासून लागू होणार नियम

देशातील प्रत्येक वाहनधारकांकडे फास्टॅग असणे अनिवार्य आहेत. आता फास्टॅगच्या नियमात बदल केले जाणार आहे. आता फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य नसणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना सतत फास्टॅग केवायसी करावी लागणार नाहीये.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने वाहनांसाठी केवायसी प्रक्रिया बंद केली आहे.NHAI ने याबाबत घोषणा केली आहे. यामध्ये १ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन वाहनांसाठी फास्टॅग केवायसी करावी लागणार नाहीये. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

फास्टॅग केवायसी अनिवार्य नाही (FASTag KYC Not Mandatory)

याआधी जेव्हा कोणताही वाहनधारक नवीन FASTag खरेदी करत असेल तेव्हा त्याला केवायसी करावी लागत होती. यामध्ये अनेक समस्या येत होत्या. यामध्ये चुकीची माहिती, कागदपत्र पडताळणी यामध्ये अडचणी येत होत्या.त्यामुळेच आता सरकारने नवीन फास्टॅगसाठी स्वतंत्र केवायसीची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. वाहनांच्या रजिस्ट्रेनची पडताळणी केली जाणार आहे. फास्टॅग खरेदी करताना या सर्व माहितीची पडताळणी केली जाणार आहे.

जुन्या फास्टॅगधारकांसाठी काय बदल होणार

जर तुमच्या वाहनांमध्ये फास्टॅग असेल तर तुम्हाला तुमचे केवायसी पुन्हा करण्याची गरज नाही. जर कोणत्याही तक्रारी नसतील तर फास्टॅग सर्व्हिस सुरु राहिली. परंतु जर चुकीच्या पद्धतीने फास्टॅग जारी केला असेल तर त्याची चौकशी केली जाणार आहे. बँकांना फास्टॅग करण्यापूर्वी संपूर्ण पडताळणी करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Treaty of Purandar: छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पुरंदरचा तह काय होता?

Pune Politics: पुण्यात शिवसेना-भाजपची महायुती तुटली? अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता

Government Job: सरकारी नोकरीची संधी! सैनिक कल्याण विभागात भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? वाचा

Thick And Natural Eyebrows Tips: जाड आयब्रोज हवेत? मग पार्लरला जाण्यापूर्वी 'या' 5 घरगुती टिप्स नक्की ट्राय करा; ७ दिवसांत दिसेल मोठा फरक!

Maharashtra Live News Update: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये; पत्रकार परिषद घेणार

SCROLL FOR NEXT