Fastag KYC Online Link, Process
Fastag KYC Online Link, Process  Saam Tv
बिझनेस

Fastag KYC अपडेट करण्याची शेवटची मुदत! ऑनलाइन-ऑफलाइन कसे कराल लिंक, पाहा प्रोसेस

कोमल दामुद्रे

Fastag KYC Online Process :

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने फास्टॅगबाबात महत्त्वाची माहिती दिली होती. Fastag केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख आता वाढवण्यात आली होती. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत केवायसी करु शकतो असे सांगण्यात आले होते.

आज Fastag KYC करण्याची शेवटची तारीख आहे. फास्टॅगमुळे महामार्गावरील टोल गोळा करणे सोपे जाते. ही इलेक्ट्रॉनिक पद्धत असून ज्यामध्ये वाहनावरील कोड स्कॅन होतो तसेच टोलचे पैसे (Money) हे अकाउंटमधून ट्रान्सफर केले जातात.

जर तुमचेही केवायसी अपडेट केलेले नसेल तर फास्टॅग उद्यापासून काम करणार नाही. NHAI ने हे पाऊल फसवणूक थांबवण्यासाठी केले आहे. फास्टॅगची केवायसी कशी करायची जाणून घेऊया प्रोसेस

1. फास्टॅग केवायसी करण्याची प्रक्रिया काय?

  • सर्वात आधी बँकेशी (Bank) लिंक असलेल्या फास्टॅग वेबसाइटवर जावे लागेल.

  • यानंतर तुमचा अधिकृत मोबाइल नंबर आणि ओटीपी वापरुन लॉग इन करा.

  • त्यानंतर माय प्रोफाइल निवडा नंतर केवायसीवर क्लिक करा.

  • आवश्यक ती माहिती भरुन सबमिट करा. यामध्ये तुम्हाला केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे वाहनाची आरसी, पत्ता पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल.

  • याप्रकारे तुमचे फास्टॅग केवायसी होईल.

(FASTag KYC Procedure)

2. ऑनलाइन स्टेटस कसे तपासाल?

  • सर्वात आधी fastag.ihmcl.com या लिंकला भेट द्यावी लागेल.

  • होम पेजवर लॉग इन करुन मोबाइल नंबर आणि ओटीपीद्वारे लॉग इन करा.

  • माय प्रोफाइलवर जा आणि केवायसी स्टेटस विभाग निवडा.

  • नवीन विंडो उघडल्यानंतर केवायसीचे स्टेटस कळेल.\

(Know How to Check Online Status)

3. फास्टॅग केवायसी ऑफलाइन कसे कराल?

शेवटची तारीख असल्यामुळे सर्व्हर डाउन असू शकतो. त्यामुळे ऑफलाइन केवायसी देखील करु शकता. ऑफलाइन फास्टॅग केवायसीसाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला केवायसी फॉर्म भरावा लागेल. कागदपत्रे जोडून सबमिट करा. फॉर्म पडताळल्यानंतर फास्टॅग अपडेट केले जाईल. यासाठी तुम्हाला कारची आरसी प्रत, ओळखपत्र (पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड)अॅड्रेस प्रफू आणि पासपोर्ट साइज फोटो. (Fastag KYC Offline)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Eyes: नजर चांगली ठेवण्यासाठी 'या' ५ गोष्टींनी डोळे ठेवा निरोगी

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस

SCROLL FOR NEXT