Farmer ID Card Saam Tv
बिझनेस

Farmer ID Card: आता प्रत्येक शेतकऱ्याला नवीन ओळखपत्र; मोदी सरकारचा नवा प्लॅन, काय फायदा होणार? जाणून घ्या

Farmer ID Card: देशभरातील शेतकऱ्यांना आता ओळखपत्र मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कृषी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हे ओळखपत्र देण्यात येणार आहे.

Siddhi Hande

भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आधार कार्डसारखे ओळखपत्र देण्यात येणार आहे. यासाठी सरकार देशभरातील शेतकऱ्यांची नोंदणी करणार आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची ही योजना आहे. भारतीय कृषी परिषदेच्या सहकार्याने आउटलूक अॅग्रीटेक समिट पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र

शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार ओळखपत्र हे न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या योजनांसाठी अर्ज करतानाच्या पडताळणीसाठी मदत करेल. यामुळे योजनांमध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख पटवणे सोपे होणार आहे. या योजनेत १९ राज्यांनी सहभागी होण्यासाठी सहमती दर्शवली आहे. यासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये एक पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या नोंदणीमुळे विविध कृषी योजनेपर्यंत पोहचवणे सोपे होणार आहे. तसेच सरकारी योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यास मदत होणार आहे. एआय आधारित चॅटबॉक्ससारखे तंत्रज्ञानही शेतकऱ्यांसाठी विकसित केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT