यूपी सरकारकडून शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी मोठं गिफ्ट
कृषी यंत्रसामग्रीवर सबसिडी दिली जाणार
७ ते २० ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे
यंदाचा दसरा शेतकऱ्यांसाठी आनंद घेऊन येणारा ठरणार आहे, कारण युपी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांपैकी एक म्हणजे शेतकऱ्यांना आता शेती संबंधित मशीनवर सबसिडी मिळणार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेती संबंधित यंत्रांवर आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ७ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, सब मिशन ऑन अॅग्रीकल्चरल मेकॅनायझेशन (SMAM) योजनेंतर्गत तब्बल २,१६६ शेती संबंधित मशीनवर ही सबसिडी दिली जाणार आहे. याशिवाय दुसऱ्या एका योजनेंतर्गत आणखी १,७५५ शेती संबंधित मशीनव आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणांचा वापर करून शेतीची कामे अधिक जलद आणि कमी खर्चात करता येतील.
सरकारकडून फक्त शेतकऱ्यांना वैयक्तिक कामांसाठीच नाहीतर, कस्टम हायरिंग सेंटर आणि फार्म मशीनरी बँक उभारण्यासाठीही आर्थिक मदत दिली जाणार आहे. या दोन्हींसाठी १० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच कृषी ड्रोन आणि इतर आधुनिक यंत्रसामग्रीसाठीही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. फसल अवशेष व्यवस्थापन योजनेंतर्गत वैयक्तिक कृषी यंत्रे आणि कस्टम हायरिंग सेंटरसाठी ३० लाख रुपयांपर्यंत मदत मिळण्याची तरतूद आहे. याशिवाय कीड व रोग नियंत्रण योजनेंतर्गत पीक संरक्षण उपकरणांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी www.agriculture.up.gov.in या कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जावे. त्यानंतर Kisan Corner मध्ये उपलब्ध असलेल्या “Yantra Booking Prarambh” या पर्यायावर क्लिक करून यंत्राची बुकिंग व ऑनलाइन अर्ज करता येईल. याच पोर्टलवर अनुदान, यंत्रांची माहिती आणि अर्ज प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.