Farmer Relief  saam tv
बिझनेस

Farmer Relief : शेतकऱ्यांच्या खात्यात याच आठवड्यात जमा होणार ५ हजार रुपये; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Big Update for Maharashtra Farmers: महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम दुष्काळी मदत मिळण्याची चर्चा आहे.

Sakshi Sunil Jadhav

राज्यातल्या दु्ष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यातल्या १.५० कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रिम दुष्काळी मदत देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या मदतीसाठी सरकारला एकूण ७ हजार ५०० कोटी रुपये खर्च करावे लागल्याचे सांगितले जात आहे. पण या निर्णयाबाबत अधिकृत शासन निर्णय किंवा सरकारची पु्ष्टी तपासणं आवश्यक आहे.

कधी जमा होणार ५ हजार रुपये?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मदतीची रक्कम याच आठवड्यात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या मदतीचा उपयोग शेतीशी संबंधित खर्च आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी होऊ शकतो. पण पैसे जमा होण्याची निश्चित तारीख, पात्र शेतकऱ्यांचे निकष आणि मदतीच्या वितरणाची पद्धत याबाबत अधिकृत माहिती समोर येणं महत्त्वाचं आहे.

तसेच राज्यातील दुष्काळ लक्षात घेता जलसंधारणावर विशेष लक्ष देण्याच्या मुख्यमंत्री यांच्या सर्व मंत्र्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. छोटे बंदरे, तलाव रुंदी करण, गाळ उपसणे यांवर विशेष भर देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रायगड प्रमाणे लोकसहभागातून छोटे बंधारे बांधून पाणी अडवून त्यांचे पर्क्यूलेशन वाढवण्यावर भर देण्याबाबत कॅबिनेट बैठकित चर्चा झाली. सर्व मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या कॅबिनेट बैठकीत सूचना दिलेल्या आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांना फायनान्स कंपन्यांचा तगादा लावल्यास थेट गुन्हे दाखल करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. या कर्जमाफीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला आहे. सहकार विभागाकडून हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. आतापर्यंत १५ लाख ८५ हजार ४९३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ई-केवायसी पूर्ण करूनही कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आणखी ४ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! या योजनेच्या हप्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Maharashtra News Live Update: कुडाळ रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेवरून ठाकरे सेना आक्रमक

सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी! 20 जागा, पगार तब्बल 2 लाख; कोण करू शकतं अर्ज?

मित्रांची शक्कल, दिवाळीच्या मुहूर्तावर बनावट नोटा बाजारात आणण्याचा बेत, पुणे पोलिसांनी उधळला प्लॅन

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT