Increased Toll Tax  Saam TV
बिझनेस

Increased Toll Tax : टोल टॅक्सच्या दरात 5 टक्क्यांची वाढ; निकालाच्या आदल्या दिवशी वाहनचालकांना मोठा झटका

Ruchika Jadhav

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगलीये. उद्या म्हणजेच ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेय. अशात सामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने देशभरात टोल टॅक्स वाढवला आहे.

टोल टॅक्स कितीने वाढला?

आजपासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(NHAI) ने टोलच्या टॅक्समध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आजपासून वाहनचालकांना ५ टक्के जास्तीचा टोल भरावा लागणार आहे. टोल टॅक्समधील वाढलेल्या किंमती एप्रिल महिन्यातच लागू करण्यात येणार होत्या. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे जून महिन्यापासून वाढीव टॅक्स लागू करायचा असे ठरवण्यात आले होते.

नॅशनल हायवेवर ८५५ टोल प्लाझा

NHAI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार, ३ जून २०२४ पासून नवे दर लागू होत आहेत. नॅशनल हायवे नेटवर्कवर जवळपास ८५५ टोल नाके आहेत. यांवर साल २००८ च्या राष्ट्रीय महामार्ग नियमानुसार शुल्क आकारले जतात.

तीन ते पाच टक्के वाढ

अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, वाहनांवर तीन ते पाच टक्के टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात येत आहे. वार्षीक दरवाढीनुसार ही वाढ करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेमुळे दरवाढ लागू करण्यात आली नव्हती. मात्र आता मतदान झाले असून फक्त उद्याचा दिवस निकालाचा बाकी आहे. त्यामुळे आजपासून ही दरवाढ करण्यात आली आहे.

विरोधकांकडून विरोध

प्रत्येक वर्षी टोल टॅक्स दरामध्ये वाढ होत असते. आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना मोठ्या वाहनांसाठी टोल भरावा लागतो. हा टोल दरवर्षी वाढवला जातो. मात्र याने सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतो. त्यामुळे वाढीव टोल टॅक्सला सातत्याने विरोधकांकडून विरोध होताना दिसतो आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT