ESIC new rules 2026 meta ai
बिझनेस

ESIC New Rules 2026 : ESIC चे नवे नियम लागू! आता आजारपण आणि प्रसूतीसाठी क्लेम न करताच थेट खात्यात येणार पैसे

ESIC Direct Bank Transfer : ESIC च्या नव्या नियमांमुळे पात्र कर्मचाऱ्यांना आजारपण आणि प्रसूतीचे पैसे क्लेम न करता थेट बँक खात्यात मिळणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ESIC ने आपल्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता पात्र कर्मचाऱ्यांना आजारपणात किंवा बाळाच्या जन्मावेळी मिळणारे पैसे घेण्यासाठी सतत क्लेम करण्याची गरज भासणार नाही. महत्त्वाच्या अटी पूर्ण असतील तर ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल आणि कागदपत्रांची कटकटही कमी होईल.

ESIC च्या नव्या नियमांमध्ये काय बदल?

नवीन Employees' State Insurance (General) Regulations, 2026 अंतर्गत आजारपण आणि प्रसूतीसाठी मिळणारे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने खात्यात पाठवले जातील. हे नवीन नियम १९५० च्या जुन्या नियमांची जागा घेणार आहेत.

कोणत्या अटी पूर्ण केल्याने मिळतील थेट पैसे?

ESIC चा कोणताही वेगळा क्लेम न करता पैसे मिळवायचे असतील तर कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या तीन अटी पूर्ण कराव्या लागतील.

  1. कर्मचाऱ्यांचे मेडिकल सर्टिफिकेट ESIC च्या ऑनलाइन प्रणालीतून जारी झालेले असावे.

  2. संबंधित कंपनी किंवा नियोक्त्याने ESIC पोर्टवर आवश्यक मासिक रिटर्न जमा केलेला असावा.

  3. कर्मचाऱ्याचा विमा क्रमांक आणि बँक खातं आधारशी लिंक असणं गरजेचं आहे.

या अटी पूर्ण झाल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना थेट बँक खात्यात लाभ मिळण्याची प्रोसेस सोपी होईल.

कामावर अपघात झाला तर...

नोकरी करताना कर्मचाऱ्याला दुखापत झाल्यावर कंपनीने दिलेल्या अपघाताच्या अहवालाच्या आधारे लाभ मिळू शकतो. दुखापतीमुळे कर्मचारी काही वेळ किंवा कायमस्वरूपी काम करू शकत नसेल तर स्वतंत्र अर्ज करण्याची गरज कमी होईल. अपघातात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर स्वतंत्र अर्ज करण्याची गरज कमी होईल. अपघातात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीची प्रोसेसही सोपी केली जाईल.

मॅटर्निटी बेनिफिटच्या नियमांत बदल

प्रसूती लाभासाठी प्रसूतीच्या अपेक्षित तारखेपूर्वी दावा करण्याची मुदत ५० दिवसांवरून ५६ दिवस करण्यात आली. दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या विमाधारक महिलांसाठी ही मुदत ४२ दिवस असेल.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार ESIC चा लाभ?

  • १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या पात्र आस्थापनांमध्ये ESIC कव्हरेज लागू आहे.

  • दरमहा २१००० रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचारी सामान्यत: पात्र ठरतात.

  • दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी वेतनाची मर्यादा २५,००० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामाचा एकनाथ शिंदे घेणार आढावा

पुढील २१ दिवस या ५ राशींची चांदी; नोकरीत मिळणार प्रमोशन आणि अफाट पैसा, तुमची रास कोणती?

Health Tips : दररोज काही सेकंद पंजांवर उभे राहण्याचे 'हे' ७ फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा सविस्तर

Pune : पुण्यात धक्कादायक घटना! माजी पोलिसाने महिलेसोबत गैरवर्तन केलं अन्...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 3% ऐवजी आता 6% इन्क्रिमेंटची मागणी

SCROLL FOR NEXT