EPS Pension Hike Google
बिझनेस

EPS Pension Hike: वेज सीलिंग वाढल्यास मिळणार ₹12,500 पेन्शन? वाचा संपूर्ण गणित

EPFO Pension: EPS वेज सीलिंग ₹25,000 झाल्यास 35 वर्षांच्या सेवेसह ₹12,500 पेन्शनचे गणित कसे जुळते, योगदान किती वाढेल आणि प्रत्येकाला ही रक्कम मिळेल का, जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

EPS Pension Hike: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS संदर्भात वेज सीलिंग वाढवण्याची चर्चा सुरू आहे. सध्याची ₹१५,००० रुपयांची वेज सीलिंग ₹२५,००० पर्यंत वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील पेन्शनमध्ये मोठा बदल होऊ शकतो. यामुळे सोशल मीडियावर ₹१२,५०० महिन्याची पेन्शन मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ही रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळेलच असे नाही.

पेन्शनची गणना कशी होते?

EPS अंतर्गत पेन्शनची गणना एका निश्चित सूत्रानुसार केली जाते.

मासिक पेन्शन = पेंशन योग्य वेतन × पेंशन योग्य सेवा ÷ ७०

पेंशन योग्य वेतनासाठी निवृत्तिआधीच्या दिवसात वेतनाचा विचार केला जातो. प्रस्तावित ₹२५,००० वेज सीलिंगनुसार कमाल पेंशन योग्य वेतन ₹२५,००० गृहीत धरले जाऊ शकते.

₹१२,५०० पेन्शन कशी मिळू शकते?

एखाद्या कर्मचाऱ्याचे सरासरी पेन्शन योग्य वेतन ₹२५,००० आणि पेंशन योग्य सेवा ३५ वर्षे असल्यास गणितानुसार पेन्शन ₹१२५०० पर्यंत जाऊ शकते. ३३ वर्षांच्या सेवेनंतर लागू होणारा २ वर्षांचा सर्व्हिस बोनस धरल्यास सेवा ३५ वर्षे मानली जाऊ शकते.

EPF योगदानातही वाढ

₹१५,००० च्या जुन्या मर्यादेनुसार EPS मध्ये नियोक्त्याचा ८.३३ टक्के हिस्सा म्हणजे कमाल ₹१,२५० रुपये जमा होत होता. ₹२५,००० वेज सीलिंग लागू झाल्यास ही रक्कम सुमारे ₹२,०८३ रुपये होऊ शकते.

प्रत्येकाला ₹१२,५०० पेन्शन मिळेल का?

नाही. फक्त ₹२५,००० बेसिक वेतन असल्याने ₹१२,५०० पेन्शनची हमी मिळत नाही. पेंशन योग्य सेवा, सरासरी वेतन आणि लागू नियम यावर अंतिम रक्कम अवलंबून असेल. EPS पेन्शनसाठी किमान १० वर्षांची पेंशन योग्य सेवा आवश्यक आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांसाठी किमान ₹१,००० मासिक पेन्शनची तरतूद आहे. त्यामुळे वेज सीलिंग वाढल्याने दीर्घकाळ EPFO मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. मात्र प्रत्यक्ष पेन्शनची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवा आणि वेतनाच्या गणनेनुसार वेगळी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT