EPF Calculation Saam Tv
बिझनेस

EPF Withdrawal: कोणत्या कारणांसाठी आणि किती PF काढू शकतात? प्रत्येक कर्मचाऱ्याला हे नियम माहित असायलाच हवेत

PF Withdrawal Rule: प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमधून पैसे काढू शकतात. परंतु पैसे काढण्यासाठी काही अटी आणि नियम आहेत.

Siddhi Hande

EPFO चे नियम

कोणत्या कारणासाठी काढू शकतात PF

PF काढण्यासाठी अटी काय?

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओमधून आता कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे काढणे खूप सोपे झाले आहे. ईपीएफओने पैसे काढण्याचे नियम आणखी सोपे केले आहेत.याआधी पैसे काढण्यासाठी अनेक अटी होत्या. आता हे नियम सोपे केले असून तुम्ही फक्त ३ कॅटेगरीमध्ये पैसे काढू शकतात. दरम्यान तुम्ही कधी आणि किती पीएफ काढू शकतात हे जाणून घ्या.

ईपीएफचे उद्दिष्ट काय?

ईपीएफचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांचा रिटायरमेंट फंड तयार करणे आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांकडे एक ठरावीक रक्कम असावी, त्यामुळे ईपीएफमध्ये दर महिन्याला एक ठरावीक रक्कम जमा केली जाते. यामध्ये तुम्हाला व्याजदेखील मिळते. दरम्यान, आता ईपीएफओने पीएफ काढण्याचे नियम सोपे केले आहेत.

या कारणांसाठी काढू शकतात पैसे (PF Withdrawal Rules By EPFO)

सेवानिवृत्तीनंतर मिळतात पीएफचे पैसे

ईपीएफओच्या नियमाअंतर्गत रिटायरमेंटनंतर ईपीएफचे पैसे मिळतात. वयाच्या ५८ किंवा ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात. याचसोबत वॉलेंटरी रिटायमेंट, दिव्यांग किंवा परदेशात सेटल व्हायचे असेल तर पीएफचे पैसे काढू शकतात.

नोकरी सोडल्यावर काढू शकतात पैसे

नोकरी सुटल्यावर तुम्ही पीएफचे पैसे काढू शकतात. परंतु सर्व पैसे एकाच वेळी मिळणार नाही. तुम्ही नोकरी सुटल्यानंतर ७५ टक्के रक्कम काढू शकतात. यानंतर जेव्हा तुम्ही १ वर्षभर बेरोजगार असाल तेव्हा २५ टक्के रक्कम काढू शकतात.

घर, वैद्यकीय गोष्टींसाठी काढू शकतात पैसे

तुम्ही घर खरेदी करण्यासाठी पीएफमधील पैसे काढू शकतात. ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी ९० टक्के रक्कम काढू शकतात. होम लोन रीपेमेंटसाठी १० वर्ष नोकरी करावी लागते. घराचे बांधकाम करण्यासाठी पैसे काढू शकतात. याचसोबत जर कोणती मेडिकल इमरजन्सी असेल तर तुम्ही पैसे काढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT