EPFO  Saam Tv
बिझनेस

ELI Scheme: EPFO ने आणली लय भारी योजना! या कर्मचाऱ्यांना मिळणार १५००० रुपये

EPFO EIL Scheme: ईपीएफओ लवकरच कर्मचाऱ्यांसाठी नवीन योजना राबवणार आहे. या योजनेअंतर्गत काही कर्मचाऱ्यांना १५००० रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी नवीन योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ऐम्नेस्टी स्कीम सुरु करण्याच्या तयारी आहेत. या योजनेअंतर्गत कंपन्यांना फायदा होणार आहे. ज्या कंपन्या आर्थिक भार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे EPFO मध्ये नोंदणी पूर्ण करु शकल्या नाहीत किंवा त्यांची खाती सक्रिय ठेवू शकल्या नाहीत. त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. (EPFO ELI Scheme)

केंद्रिय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सूचनेनुसार या योजनेची रुपरेषा तयार केली जात आहे. डिसेंबरअखेर ही योजना जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, कर्जमाफी योजना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमचा भाग असेल. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी कामगारांना संघटित क्षेत्राशी जोडण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. यामध्ये EPFO मध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये १५ हजार रुपये दिले जाणार आहेत. (Employee Linked Incentive Scheme)

उत्पादन क्षेत्रात संधी निर्माण करण्यासाठी EPFO संबंधित आर्थिक सहाय्य दिले जाईल. याचसोबत १ लाखांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियोक्तांना ३ हजार रुपये दिले जाणार आहे. दोन वर्षांसाठी हे पैसे दिले जाणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना ELI शी जोडण्याची संधी मिळेल. यामुळे कर्मचाऱ्यांना ईपीएफओमध्ये नोंदणी करता येणार आहे.

या योजनेअंतर्गत २०१७ ते २०२४ दरम्यान, ज्यांना EPFO मध्ये नोंदणी पूर्ण करता आसी नाही किंवा नोंदणीनंतर वेळेवर योगदान जमा करता आले नाही, त्यांना या योजनेअंतर्गत दिलासा मिळणार आहे. ज्यामुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांना EPFO मध्ये सामील करण्याची संधी मिळेल. (EPFO New scheme)

नियम

कोणत्याही कंपनी किंवा फर्ममध्ये २० पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास त्यांना ईपीएफओमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. ईपीएफओमध्ये नोंदणी न केल्यास किंवा वेळेवर योगदान न केल्यास तुमचे खाते निष्क्रिय केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT