EPFO’s new rule offers ₹50,000 insurance benefit under EDLI scheme, even if PF account has zero balance. Saam Tv
बिझनेस

EPFO चा मोठा निर्णय; पीएफ खात्यात एकही पैसा नसला तरी EDLI मधून मिळतील ५०,०००रुपये

EPFO EDLI Insurance: आधी या योजनेचा हा लाभ मिळविण्यासाठी पीएफ खात्यात ५०,००० रुपये शिल्लक असणे आवश्यक होते, परंतु आता ही अट काढून टाकण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • EPFOनं EDLI योजनेत मोठा बदल करत पीएफ खात्यात शिल्लक नसतानाही ₹५०,००० मिळण्याचा निर्णय घेतलाय.

  • आधी किमान ₹५०,००० शिल्लक आवश्यक होते, ती अट आता रद्द करण्यात आलीय.

  • EDLI योजना कर्मचारी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला विमा रक्कम देण्यासाठी आहे.

  • या निर्णयामुळे लाखो कर्मचार्‍यांना विमा सुरक्षा मिळणार आहे.

EPFOनं पीएफधारकांसाठी अंत्यत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. EPFO द्वारे चालवली जाणाऱ्या विमा योजनेत मोठा बदल करण्यात आला असून कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पीएफ खात्यात पैसे नसले तरी EDLI मधून म्हणजेच विमा खात्यातून किमान ५०हजार रुपये मिळतील. दरम्यान EPFO अंतर्गत कर्मचारी ठेवींशी संलग्न विमा योजना (EDLI) राबवली जाते. या योजनेचा उद्देश संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करणे आहे.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीवर असताना मृत्यू झाला तर या योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला एकरकमी विमा रक्कम मिळत असते. ही रक्कम अडीच लाख ते ७ लाखांपर्यंत असू शकते. विशेष म्हणजे या विम्यासाठी कर्मचाऱ्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत.आता ईपीएफओने ईडीएलआयच्या नियमांमध्ये खूप महत्त्वाचा बदल केलाय.आधी विम्याचा लाभ घेण्यासाठी ५०,००० रुपये जमा करावे लागत असायचे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, कुटुंबाला विमा लाभ मिळण्यासाठी त्याच्या पीएफ खात्यात किमान ५०००० रुपये जमा ठेवावी लागत होते.

आता ही अट काढून टाकण्यात आलीय. एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात ५०,०००पेक्षा कमी रक्कम असेल किंवा खाते रिकामे असले तरीही, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना किमान ५०,००० रुपयांचा विमा लाभ निश्चितच मिळेल. या नवीन नियमांमुळे मृत्यूनंतर दावा दाखल करण्याची मुदतही वाढवलीय. आता जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार मिळाल्यापासून सहा महिन्यांच्या आत मृत्यू झाला, तरी या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. हा बदल विशेषतः कमी पगार असलेल्या आणि नवीन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.

सतत सेवेच्या नियमात आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता जर एखाद्या कर्मचाऱ्याला सतत एक वर्ष सेवा पूर्ण करायची असेल आणि त्याच्या दोन नोकऱ्यांमध्ये ६० दिवसांचे म्हणजेच दोन महिन्यांचे अंतर असेल, तरीही त्याची सेवा सतत मानली जाईल. म्हणजेच, जर एखाद्याने अनेक नोकऱ्या केल्या असतील आणि प्रत्येक नोकरीत दोन महिन्यांपेक्षा कमी अंतर असेल, तर त्याच्या सर्व नोकरीचा कालावधी एकत्र जोडला जाईल. यामुळे त्याच्या कुटुंबाला संपूर्ण विमा लाभ मिळू शकेल.

ईपीएफओने कोणता नवा निर्णय घेतलाय?

पीएफ खात्यात पैसे नसतानाही EDLI योजनेतून ₹५०,००० मिळण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

आधी ही योजना मिळवण्यासाठी काय अट होती?

पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएफ खात्यात ₹५०,००० शिल्लक असणे आवश्यक होते.

EDLI योजना म्हणजे काय?

EDLI ही कर्मचारी जमा विमा योजना आहे जी EPFOद्वारे चालवली जाते आणि कर्मचारी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळते.

या निर्णयाचा कोणाला फायदा होईल?

संघटितक्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT