EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFOनं कर्मचाऱ्यांना दिली गुड न्यूज; कर्मचारी भविष्य निधीमधील पैशांवर मिळणार भरघोस व्याज

EPFO Interest Rate: सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कर्मचारी भविष्य निधीमधील पैशांवर देण्यात येणाऱ्या व्याजात वाढ केलीय.

Bharat Jadhav

सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर मंजूर केलाय. यामुळे ईपीएफओ त्यांच्या ७ कोटींहून अधिक खातेधारकांना फायदा होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने २८ फेब्रुवारी रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. हे मागील आर्थिक वर्षात दिलेल्या व्याजदरा इतकं आहे.

व्याजदर मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अर्थ मंत्रालयाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफवर ८.२५ टक्के व्याजदर देण्यास सहमती दर्शवलीय, अशी माहिती कामगार मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. आता २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी मंजूर दरानुसार, सात कोटींहून अधिक ईपीएफओ भागधारकांच्या खात्यात व्याज जमा होणार आहे.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओची बैठक झाली. या बैठकीत व्याजदराबाबत निर्णय घेण्यात आलाय. फेब्रुवारी २०२४ मध्ये ईपीएफओने २०२३-२४ साठी व्याजदर २०२२-२३ मध्ये ८.१५ टक्क्यांवरून किरकोळ वाढवून ८.२५ टक्के केला होता. त्यावेळी मार्च २०२२ मध्ये, २०२१-२२ साठी ईपीएफवरील व्याजदर ८.१ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय. जो चार दशकांहून अधिक काळातील सर्वात कमी पातळी आहे. २०२०-२१ मध्ये ते ८.५ टक्के होते.

बॅलन्स कसा तपासणार

ईपीएफओमध्ये बॅलन्स चेक करण्यासाठी ४ पर्याय आहेत.

पहिला पर्याय एसएमएस द्वारे बॅलन्स चेक करणं

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून या स्वरूपात एसएमएस पाठवा. EPFOHO UAN वापरून ते ७७३८२९९८९९ वर पाठवा.

मिस्ड कॉल द्वारे बॅलन्स चेक करा

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून या नंबरवर मिस्ड कॉल द्या. ९९६६०४४४२५ वरील कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि तुम्हाला ईपीएफ बॅलन्सबद्दल एसएमएस मिळेल.

UMANG App वरून बॅलन्स कसा बघाल

तुमच्या स्मार्टफोनमध्ये उमंग अॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर त्या अ‍ॅपवर जा आणि EPFO ​​सेवा निवडा. त्यानंतर View Passbook पर्यायावर क्लिक करा आणि UAN आणि OTP वापरून लॉगिन करा. तुम्हाला तुमच्या पासबुक आणि बॅलन्सबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

EPFOच्या वेबसाइटवरून बॅलन्स चेक करा

ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर Our Services → For Employees → Member Passbook वर क्लिक करा. UAN, पासवर्ड कॅप्चा टाकून लॉगिन करा. तेथे तुम्हाला पासबूक दिसेल त्यात तुम्ही बॅलन्स चेक करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT