EPFO PF Withdrawal नियमांमध्ये बदल
नोकरी गेल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना PF मधील ७५% रक्कम काढता येईल
उर्वरित २५% साठी एक वर्ष वाट पाहावी लागणार
PF Withdrawal साठी किमान एक वर्ष सेवा पूर्ण करण्याची अट महत्त्वाची आहे
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF संदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. Partial Withdrawal , नोकरी सुटल्यानंतर PF काढणे आणि संपूर्ण PF सेटलमेंट याबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीच्या काळात PF मधून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यावर भर देण्यात आला आहे.
पूर्वी PF चे पैसे काढण्यासाठी वेगवेगळे १३ नियम लागू होते. मात्र, आता ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी पैसे काढण्याचे नियम तीन प्रमुख श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्या कारणासाठी PF मधून पैसे काढता येतील, हे कर्मचाऱ्यांना अधिक सहज समजणार आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक गरज भासल्यास कर्मचाऱ्यांना पीएफचे अर्धे पैसे काढता येतील. या कारणासाठी जास्तीत जास्त १० वेळा PF मधून पैसे काढण्याची परवानगी आहे. कुटुंबातील लग्नासाठी जास्तीत जास्त ५ वेळा PF काढता येणार आहे. आजारपणासाठी असलेली Partial Withdrawal ची सुविधाही कायम ठेवण्यात आली आहे.
नवीन घर खरेदी करायचे असल्यास किंवा घराच्या बांधकामासाठी आर्थिक गरज असल्यास PF मधून काही रक्कम काढता येऊ शकते. मात्र, पैसे काढण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. त्या लक्षात घेणे आवश्यक आहे.
नोकरी सुटल्यानंतर PF खात्यातील संपूर्ण रक्कम लगेच मिळणार नाही. नव्या नियमानुसार, पात्र कर्मचाऱ्याला PF खात्यातील ७५ टक्के रक्कम तातडीने काढता येईल. उर्वरित २५ टक्के रक्कम काढण्यासाठी १२ महिने म्हणजेच एक वर्ष वाट पाहावी लागणार. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याच्या PF खात्यात १ लाख रुपये असल्यास नोकरी सुटल्यानंतर ७५ हजार रुपये काढता येतील. उर्वरित २५ हजार रुपये मिळवण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागेल.
PF Withdrawal साठी अर्ज करताना कर्मचाऱ्याने किमान एक वर्ष सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक असल्याचे या नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे. अट पूर्ण न केल्यास PFच्या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. दरम्यान, PF खात्यावर सध्या ८.२५ टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे. नोकरी सुटल्यानंतर ७५ टक्के रक्कम काढली तरी खात्यात शिल्लक असलेल्या २५ टक्के रकमेवर लागू नियमानुसार व्याज मिळत राहते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.