EPFO New Rule Saam Tv
बिझनेस

EPFO चा नवीन नियम! आता कोणत्याही बँकेच्या कोणत्याही ब्रँचमधून काढता येणार पेन्शन

EPFO New Rule Of Withdraw Money: ईपीएफओच्या नियमांमध्ये १ जानेवारी २०२५ पासून मोठा बदल होणार आहे. आता पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेच्या कोणत्याही ब्रँचमधून पैसे काढता येणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर EPFO च्या पेन्शन स्कीमअंतर्गत दर महिन्याला पेन्शन मिळते. ही पेन्शन दर महिन्याला तुमच्या बँकेतून काढावी लागते. या योजनेच्या नियमांमध्ये आता बदल केले जाणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हे नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. आता सेवानिवृत्त कर्मचारी कोणत्याही बँकेच्या कोणत्याही ब्रँचमधून पेन्शन काढू शकणार आहेत. केंद्र सरकारने या नवीन सिस्टीमला मंजुरी दिली आहे.

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. याआधी कर्मचाऱ्यांना ज्या बँकेत अकाउंट आहे त्याच बँकेतून पैसे काढता येत होते. दरम्यान, आता कर्मचारी कोणत्याही बँकेच्या कोणत्याही ब्रँचमधून पैसे काढू शकणार आहे. २०२५ पासून हा नवीम नियम लागू करण्यात येणार आहे. (EPFO New System)

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या पेन्शनचे पैसे काढणे सोयीचे व्हावे, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. सध्या खाजगी कंपन्यांमध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या असलेल्या बँकेतूनच पैसे काढता येत आहेत. जर एखाद्या व्यक्तीचे गावच्या बँकेच्या ब्रँचमध्ये खाते असेल तर त्याला तिथेच जाऊन पेन्शन काढावी लागत होती. मात्र, आता हे टेन्शन लवकरच दूर होणार आहे.

या नवीन ईपीएफओ पेन्शन सिस्टीममुळे ७८ लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. आयटी आणि बँकिंग टेक्नोलॉजीचा चांगला वापर करुन पेन्शनधारकांना अधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. (EPFO New Rule)

सध्याच्या पेन्शन पेमेंट सिस्टीममध्ये ईपीएफओचे डायरेक्ट क्षेत्रीय भागातील केवळ ३-४ बँकांसोबत कॉन्ट्रॅक्ट आहे.त्यामुळे फक्त त्याच बँकांमधून पेन्शन मिळते. परंतु आता नवीन सिस्टीममुळे पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेत जाऊन पैसे काढता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

SCROLL FOR NEXT