१२ महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पीएफचे पैसे काढता येणार
लग्नासाठी आणि शिक्षणासाठी पीएफ पैसे तुम्ही कधीही काढू शकता
आजारपणासाठी पीएफमधून पैसे कितीही वेळा काढू शकता
घर खरेदी आणि गृहकर्जासाठी ५ वेळा पैसे काढू शकता
पीएफबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पीएफच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. याचा फायदा आता सर्वांना होणार आहे. कारण तुम्ही फक्त १२ महिन्यांची सेवा पूर्ण केल्यानंतरही तुमच्या पीएफची आगाऊ रक्कम काढू शकता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पीएफचा निधी सेवानिवृत्तीसाठी असतो पण ईपीएफओ गरजेनुसार तु्म्हाला पैसे काढण्याची परवानगी देते. २०२६ मध्ये ईपीएफओने नियम आणखी सोपे केले त्यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे काढण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. पूर्वी प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अटींची पूर्तता करावी लागत होती पण आता सर्व काही तीन भागांमध्ये विभागले गेले आहे.
अत्यावश्यक गरजा, घरगुती खर्च आणि विशेष परिस्थितीमध्ये तुम्हील पैसे काढू शकता. महत्वाचे म्हणजे तुम्हाला फक्त १२ महिन्यांची सेवा पूर्ण करूनही पीएफची आगाऊ रक्कम काढता येणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी कुणाकडे पैसे मागण्याची गरज पडणार नाही. तुम्ही थेट तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता.
तुम्ही पीएफचे पैसे किती वेळा काढू शकता याची संपूर्ण यादी समोर आली आहे. ईपीएफओने त्यामध्ये स्पष्टपणे किती आणि कसे पैसे काढू शकता हे सांगितले आहे ते आपण जाणून घेणार आहोत...
आजारपणासाठी पीएफचे पैसे काढण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारांसाठी पाहिजे तितक्या वेळा पैसे काढू शकता. याला कोणतीही मर्यादा ठेवण्यात आली नाही. ही एक मोठी दिलासादायक बाब आहे.
शिक्षणासाठी तुम्ही पीएफ खात्यातून १० वेळा पैसे काढू शकता. तुम्ही तुमच्या मुलांच्या किंवा स्वतःच्या शिक्षणासाठी तुमच्या संपूर्ण नोकरीच्या कालावधीत १० वेळा पैसे काढून घेऊ शकता.
लग्नासाठी तुम्ही ५ वेळा पैसे काढू शकता. तुम्ही तुमच्या स्वतःच्या, भावंडांच्या किंवा मुलांच्या लग्नासाठी ५ वेळा पैसे काढू शकता. ही देखील एक दिलासादायक गोष्ट आहे.
घरासाठी तुम्ही ५ वेळा पैसे काढू शकता. घर खरेदी करणे, भूखंड खरेदी करणे, घर बांधणे, गृहकर्जाची परतफेड करणे किंवा घराचे नूतनीकरण करणे या सर्व प्रकारच्या कामांसाठी तुम्ही एकूण ५ वेळा पैसे काढू शकता.
विशेष परिस्थितीमध्ये तुम्ही वर्षातून २ वेळा पैसे काढू शकता. सरकार कधीकधी कोरोना महामारी सारख्या परिस्थितीत विशेष परिस्थिती जाहीर करते. अशा परिस्थितीत तुम्ही वर्षातून २ वेळा पैसे काढू शकता.
ईपीएफओच्या नवीन नियमांनुसार, नोकरीत १२ महिन्यांची सेवा पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ शिल्लकीच्या ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता. यामध्ये तुमची आणि कंपनीची ठेव आणि व्याज या दोन्हींचा समावेश आहे. पैसे काढण्यासाठी, तुम्हाला ईपीएफओ पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी, तुमचा यूएएन (UAN) सक्रिय असल्याची आणि तुमचे केवायसी अद्ययावत असल्याची खात्री करा. ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.