कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओने नुकताच झालेल्या बैठकीमध्ये पीएफबाबत मोठा निर्णय घेतला. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कर्मचाऱ्यांना यापुढे त्यांच्या पीएफ खात्यात २५ टक्क्यांऐवजी फक्त १० टक्के रक्कम शिल्लक ठेवावी लागणार आहे. म्हणजे गरज पडल्यानंतर कर्मचारी आपल्या पीएफ खात्यातून ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकणार आहेत. पण यासाठी काही अटी असणार आहे. त्या काय ते आपण जाणून घेणार आहोत...
ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये पीएफ ९० टक्के रक्कम काढण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कमेचा वापर करता यावा हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. ईपीएफओने घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
१) ईपीएफओने नोकरी गेल्यानंतर संपूर्ण पीएफची रक्कम काढण्याचा कालावधी १२ महिन्यांवरून २ महिन्यांपर्यंत कमी केला आहे.
२) पेन्शन म्हणजेच ईपीएसची रक्कम काढण्यासाठी ३६ महिने थांबावे लागेल.
३) हा निर्णय ५५ वर्षांपर्यंतच्या पीएफ खातेधारकांना लागू होतो. त्यांना त्यांच्या खात्यात किमान १० टक्के शिल्लक ठेवावी लागतील.
४) पैसे काढण्यापूर्वी कारण आणि पात्रता आवश्यक असणार आहे.
५) कर्मचारी है पैसे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न किंवा घर खरेदी करणे किंवा बांधणे यासारख्या गरजांसाठी काढू शकतात.
६) सेवानिवृत्तीनंतर ५५ वर्षांनी अटींची पूर्तता झाल्यास कर्मचारी त्यांच्या पीएफची संपूर्ण रक्कम काढू शकता.
१) कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी दर महिना, तिमाही किंवा सहा महिन्यांनी काढता येणार आहे.
२) सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना व्याज मिळत राहिल आणि त्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळेल.
३) कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य पैसे काढू शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.