EPFO Rule Saam Tv
बिझनेस

EPFO Rule: EPFO च्या नियमांत मोठा बदल! PF चे पैसे ATM मधून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना देणार खास कार्ड

EPFO New Rule: ईपीएफओ सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ सदस्यांना आता पीएफमधून पैसे काढता येणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना एक खास कार्ड दिले जाणार आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच तुम्ही पीएफचे पैसे एटीएममधून काढू शकणार आहात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे काम सोपे होणार आहे. ईपीएफओ या नवीन सर्व्हिससाठी क्लेमची रिक्वेस्ट करण्यासाठी एक कार्ड देणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील कोणत्या सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचे नॉमिनीदेखील एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. (EPFO New rule)

ईपीएफओचे सदस्य क्लेम केल्यानंतर सात ते दहा दिवसांची वाट पाहावी लागते. त्यानंतर पैसे संबंधित बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. या नवीन सर्व्हिसनंतर तुम्हाला पीएफचे पैसे काढणे सोपे होणार आहे. यामुळे पीएफ काढण्याची प्रोसेस सिंपल होणार आहे.

ईपीएफओ सदस्यांसाठी खास कार्ड (EPFO Card)

ईपीएफओने सात कोटीपेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या सर्व्हिसअंतर्गत कर्मचाऱ्यांना एक कार्ड दिले जाणार आहे.या कार्डमुळे ते एटीएममधून पैसे काढू शकणार आहे.

नॉमिनीला मिळणार ही सर्व्हिस (EPFO Service)

जर EPFO योजनेतील एखाद्या सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचा नॉमिनी हे पैसे काढू शकतात. EDLI योजनेअंतर्गत मृत कर्मचाऱ्याचे नॉमिनी ७ लाखांपर्यंत पैसे काढू शकतात.

या कर्मचाऱ्यांना होणार फायदा

मिडिया रिपोर्टनुसार, लवकरच ही सर्व्हिस लाँच केली जाणार आहे. यामुळे ईपीएफओ सदस्यांना खूप फायदा होणार आहे. पीएफचे पैसे क्लेम करणे खूप सोपे होणार आहे. तुम्ही तुमचे पैसे लगेच काढू शकणार आहात. त्याचसोबत व्यव्हारांमध्ये पारदर्शकता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT