EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO Latest Update : EPFO चा नवा नियम, आता घरे खरेदी करताना काढता येणार PF चे पैसे, प्रोसेस काय? जाणून घ्या

EPFO New Rule 2025 : EPFO चा नवा नियम लागू होणार आहेत. आता घर खरेदीसाठी PF मधून 90% रक्कम काढता येणार. जाणून घ्या नवीन अटी, प्रक्रिया आणि ऑनलाइन क्लेम पद्धतीची सविस्तर माहिती.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहे. या नियमांमुळे अनेकांना फायदा होणार आहे. ज्या लोकांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन नियमांनुसार, तुम्हाला जर घर खरेदी करायचे असेल तर पीएफ अकाउंटमधून पैसे काढता येणार आहे.

PF चे नवीन नियम काय आहेत?

ईपीएफच्या नवीन नियमांनुसार, कर्मचारी आपले स्वतः चे घर खरेदी करण्यासाठी पीएफमधून ९० टक्के रक्कम काढू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. जुन्या नियमांनुसार पीएफचे पैसे काढण्यासाठी काही वर्षांपर्यंत नोकरी करणे गरजेचे होते. यातही बदल करण्यात आला आहे. नव्या नियमात तुम्हाला घराचा डाउन पेमेंट, होम लोन किंवा इएमआय फेडणे गरजेचे आहे. तसेच पाच वर्षे सलग नोकरी करणे यासाठी अनिवार्य आहे.

ईपीएफच्या नवीन नियमांनुसार, तुम्हाला इपीएफचे अकाउंट खोलण्याच्या ३ वर्षांनतरच पैसे काढता येऊ शकतात. यात आयुष्यात एकदाच तुम्हाला पीएफ अॅडवान्स विड्रोल करता येतो. यामध्ये ऑनलाइन क्लेमसाठी चेक किंवा बॅंकेच्या पासबुकचा फोटो आता अपलोड करता येणार नाही. ईपीएफ खाते युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) शी लिंक करताना बॅंक खातेधारकाचे नाव सत्यापित केले जाते, यासाठी आता तेर किंवा पासबुक गरज भासणार नाही.

ईपीएफ बँक खाती सीडिंग प्रक्रियेच्या माध्यमातून आता बँक खात्याच्या सत्यतेची भूमिका संपुष्टात आली आहे. या सोप्या प्रक्रियेचा फायदा अशा सदस्यांनाही होईल जे त्यांचे खाते तपशील अपडेट करणार आहेत. त्यासाठी नवीन बॅंक खाते क्रमांक आणि IFSC कोड आणि आधार OTP असणे आवश्यक आहे.

Prakash Ambedkar: पंधरा दिवसात राजकीय भूकंप होणार? प्रकाश आंबेडकरांचा पवारांवर आरोप

Shukrawar Upay: शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी करा 'हे' उपाय; घरातील नकारात्मक उर्जा होईल दूर

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Mazi Kanya Bhagyashree: लेकीच्या जन्मानंतर मिळतात ५०,००० रुपये; माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की आहे तरी काय?

Second Hand Car Guide: सेकंड हँड कार घेताना या चुकांपासून सावध राहा, पैसे वाया जाणार नाहीत

SCROLL FOR NEXT