PF Interest Rate Saam Tv
बिझनेस

PF Interest Rate: EPFO सदस्यांना मिळणार सोन्यासारखा परतावा! PF वरील व्याजदर वाढण्याची शक्यता

PF Interest Rate Will Increases: पीएफवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. २८ फेब्रुवारी रोजी ईपीएफओच्या कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफवरील व्याजदराबाबत निर्णय होऊ शकतो.

Siddhi Hande

पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच पीएफवरील व्याजदराबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. पीएफवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला आहे. या आर्थिक वर्षात व्याजदर ८ टक्क्यांपेक्षा जास्त होते. या व्याजदरात अजून वाढ होऊ शकते. (PF Interest Rate)

ईपीएफओने मागील वर्षी व्याजदर ८.२५ टक्के ठेवले होते. त्यानंतर आता हे व्याजदर वाढवले जाई शकते. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज २८ फेब्रुवारी रोजी यावर निर्णय घेऊ शकतात.

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमधून १२ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. याचसोबत कंपनीदेखील पीएफ खात्यात पैसे जमा करते. ईपीएफओचे ७ कोटी कर्मचारी सदस्य आहेत.

ईपीएफओ पीएफवरील व्याजदर ०.१० टक्के वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्याजदर वाढले तर कर्मचाऱ्यांना चांगला परतावा मिळतो. सध्या सर्वाधिक व्याजदर हे पीएफवरील गुंतवणूकीवर मिळते. पीएफचे पैसे तुम्ही आप्तकालीन परिस्थित पैसे काढू शकतात. तुम्हाला पीएफमधील सर्व पैसे सेवानिवृत्तीनंतर मिळतात.

EPFO इन्व्हेस्टमेंट कमिटी आणि अकाउंट्स कमिटीची पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबत चर्चा होऊ शकते. याच बैठकीत पीएफवरील व्याजदर वाढवायचे की नाही याबाबत निर्णय होऊ शकतो. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्षी ईपीएफओमधील गुंतवणूकीवर चांगले रिटर्न मिळाले आहेत. याचसोबत अनेक नवीन लोक जोडले गेले आहेत. तसेच क्लेम सेटलमेंट लवकरात लवकर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT