प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असतेच. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला काही पैसे कर्मचारी आणि काही पैसे कंपनीकडून जमा केले जातात. देशातील कोट्यवधि लोक ईपीएफओचे सदस्य आहेत. ईपीएफओबाबत तुम्हाला कोणतीही माहिती मिळवायची असल्याच तुम्ही ऑनलाइन पद्धतीने करु शकतात. ईपीएफओचे सबस्क्रायबर ऑनलाइन पद्धतीने असे सुविधांचा लाभ घेऊ शकतात. ईपीएफओ सदस्य पोर्टल किंवा ऑनलाइन अॅपद्वारे अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतात.
ईपीएफओ सदस्य उमंग अॅपद्वारे पैसे भरणे, पैसे काढणे किंवा व्याजदर चेक करणे याबाबत सर्व माहिती एका क्लिकवर मिळवू शकतात. यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्ही या अॅपचा लाभ घेऊ शकतात. (EPFO)
ईपीएफओ सदस्य उमंग अॅपद्वारे पीएफ अकाउंट बॅलेंस चेक करु शकतात. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उमंग अॅप डाउनलोड करावा लागेल. या अॅपवरुन तुम्ही विड्रॉल रिक्वेस्टदेखील ट्रॅक करु शकतात.सर्वप्रथम तुम्हाला अॅप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर साइन इन करावे लागेल. यानंतर आधार नंबर आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे.
ईपीएफओ अॅपवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ईपीएफओ सर्विसेज सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमधून पैसे काढायचे असेल तर तुम्हाला रेज क्लेम ऑप्शनवर क्लिक करावा लागेल.त्यानंतर यूएएन नंबर टाकावा लागेल. यानंतर तुमच्या फोन नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर तुम्हाला विड्रॉल टाइप सिलेक्ट करावा लागेल. यानंकर तुम्हाला रिक्वेस्ट सबमिट करावी लागेल.
ईपीएफओ सदस्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिला जातो. त्यामध्ये तुम्ही विड्रॉल, बॅलेंस चेक, केवायसी अपडेट, पासबुक, जनरेट जीवन प्रमाण सर्टिफिकेट, पीपीओ डाउनलोड त्याचसोबत ट्रॅकिंग आणि रजिस्ट्रेशन या सेवांचा लाभ घेऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.