EPFO Passbook Lite Saam Tv
बिझनेस

EPFO Passbook Lite : तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम आहे? ‘पासबुक लाइट’द्वारे मिनिटांत समजणार, जाणून घ्या प्रक्रिया

EPFO Balance Check Passbook : ईपीएफओने ‘पासबुक लाइट’ ही नवी सेवा सुरू केली असून, आता खातेधारकांना फक्त यूएएन क्रमांक आणि ओटीपीद्वारे त्यांचे पीएफ पासबुक त्वरित पाहता येणार आहे. लॉगिनची अडचण संपली असून या सुविधेमुळे पारदर्शकता वाढणार.

Alisha Khedekar

  • ईपीएफओने ‘पासबुक लाइट’ नवी सेवा सुरू केली

  • खातेधारकांना फक्त यूएएन आणि ओटीपीने पासबुक पाहता येणार

  • जुनी लॉगिन प्रक्रिया रद्द, सोपं आणि त्वरित बॅलन्स तपासता येणार

  • पारदर्शकता आणि खातेधारकांच्या सोयीसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFOशी संबंधित काही सुधारणा जारी केल्या आहेत. ईपीएफओने आता ‘पासबुक लाइट’ ही एक नवीन सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत ईपीएफओ खातेधारक आता एकाच क्लिकद्वारे त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात.

ईपीएफओने त्यांच्या खातेधारकांसाठी पोर्टलवर ‘पासबुक लाइट’ नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे. यामुळे खातेधारकांना त्यांच्या खात्यासाठी एक व्यापक पासबुक पाहता येईल. यामध्ये त्यांचे योगदान, पैसे काढणे आणि शिल्लक राहिलेली रक्कम थेट त्यांच्या पोर्टलवरच दिसणार आहे. यामुळे खातेधारकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय यामुळे पारदर्शकता निर्माण होणार आहे.

पासबुक लाईट म्हणजे काय ?

‘पासबुक लाइट’ हा ईपीएफओ वेबसाइटवर उपलब्ध असलेला इंटरफेस आहे. या फीचरद्वारे खातेधारक कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रक्रियेशिवाय थेट त्यांचे पीएफ बॅलन्स तपासू शकतात. याआधी खातेधारकांना यूएएन क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा टाकावा लागत असे. त्यामुळे संबंधित खातेधारकांना पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र, आता ही प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. खातेधारकांना फक्त त्यांचा यूएएन क्रमांक आणि ओटीपी टाकल्यास त्यानंतर ते त्यांचे पासबुक पाहू शकतात. म्हणजेच पासबुक पाहण्यासाठी पूर्वीसारखं लॉगइन करावं लागणार नाही किंवा वाट पाहावी लागणार नाही.

पासबुक लाइट कसे वापरावे?

  • आधी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला http://www.epfindia.gov.in भेट द्या.

  • त्यानंतर पासबुक लाइट ऑप्शनवर क्लिक करा

  • आता तुमचा यूएएन क्रमांक टाका

  • आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल

  • तो ओटीपी टाकून सबमिट करा

  • तुमचे पीएफ पासबुक स्क्रीनवर तुम्हाला दिसेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कोण मारणार बाजी? यंदा ठाकरे बंधूंचा करिष्मा चालणार का?

Pimpri-Chinchwad Koita Gang: पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन घरफोड्या करून दागिने लंपास

Maharashtra Live News Update: हत्येच्या आरोपीची नंदूरबार पोलिसांनी काढली शहरातून धिंड

Mumbai–Nanded Weekly Special Trains: सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई–नांदेड दरम्यान ४ विशेष गाड्या सुरू

पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात मोठा राडा; वकील आणि IPS महिला अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT