EPFO News Saam Tv
बिझनेस

एका सेल्फीवर EPF चं खातं उघडता येणार; जाणून घ्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप

EPFO News : आता केवळ एका सेल्फीवर EPFचं खातं उघ़डता येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी नवी प्रक्रिया कशी असणार त्यावरचा हा रिपोर्ट

Saam Tv

कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी ईपीएफओची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलीय. ईपीएफओनं आता थेट कर्मचाऱ्यासाठी 'फेस ऑथेंटिकेशन'चं तंत्रज्ञान आणलंय. यासाठी कंपनीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. जर तुम्ही नोकरी बदलली, तर जुन्या कंपनीतून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पूर्वीच्या कंपनीच्या मंजुरीची गरज नाही; हे काम आता 'वन एम्प्लॉई - वन ईपीएफ खाते' या धोरणांतर्गत ऑटोमॅटिक होणार. ही प्रक्रिया कशी असणार ते पाहूयात...

सेल्फी काढा, EPFचं खातं उघडा

1. कर्मचाऱ्याचं सेल्फीद्वारे फेस ऑथेंटिकेशन होणार

2. UAN नंतर स्वत:च जनरेट करता येणार

3. एप्रिलपासून UPI द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार

4. कर्मचाऱ्याला ऑटो-क्लेम सेटलमेंट करता येणार

फेस ऑथेंटिकेशनचा सर्वात मोठा फायदा पेन्शनधारकांना होणारेय कारण दरवर्षी नोव्हेंबरमध्ये 'हयातीचा दाखला' देण्यासाठी बँकेत जावे लागायचे. पण आता घरबसल्या स्मार्टफोनवरून चेहरा स्कॅन करून व्हेरिफिकेशन करू शकतात. या सुविधेमुळे सर्वांच्याच वेळेची बचत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia vs Ukraine war : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा पेटलं; युक्रेनचे लष्करी तळ उद्धवस्त, VIDEO

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

SCROLL FOR NEXT