EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO Interest Rate : नोकरी करणाऱ्यांसाठी खूशखबर! PF च्या व्याजदरात वाढ होणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

EPFO Interest For FY24

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या व्याजावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. यासंबंधी केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यामध्ये मंडळ 2023-24 या आर्थिक वर्षात ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या व्याजावर निर्णय घेतला जाऊ शकतो. EPFO शी संबंधित 6 कोटींहून अधिक कर्मचारी आहेत.  (Maharashtra News)

CBT च्या 235 व्या बैठकीबाबत सोशल सिक्युरिटी बोर्डने मंडळाच्या सर्व सदस्यांना पत्र पाठवलं आहे. त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी सांगितलं की, 'ईपीएफ सदस्यांनी काढलेले पैसे, ईपीएफ खात्यातून मिळालेले पैसे आणि वर्षभरात मिळालेले उत्पन्न यावर व्याज (EPFO Interest) ठरवलं जातं. शनिवारी होणाऱ्या बैठकीत व्याजदरात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. कारण महागाईचा दर आणि व्याजदर हे वर्षभर जास्त आहेत. गेल्या वर्षी EPFO चा सरप्लस चांगला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्याजदर जाहीर केले जाणार

मागील वर्षी 28 मार्च रोजी EPFO ने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांवर 8.15 टक्के व्याज जाहीर केलं होतं. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वितरणासाठी 90, 497.57 कोटी रुपयांचं उत्पन्न उपलब्ध होते. सभासदांच्या खात्यात व्याज जमा केल्यानंतर 663.91 कोटी रुपये सरप्लस होता. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार आता EPFO व्याजदर सार्वजनिकपणे अर्थ मंत्रालयाच्या परवानगीनंतरच जाहीर केले जातील.

गेल्या वर्षी जुलैमध्ये कामगार मंत्रालयाने CBT ला अर्थ मंत्रालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय 2023-24 या आर्थिक वर्षातील व्याजदर जाहीरपणे जाहीर करू नये, असं सांगितलं होतं. याशिवाय उच्च निवृत्ती वेतन, ईपीएफओमधील रिक्त पदांवर भरती आणि ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

इक्विटीमधील गुंतवणुकीचा हिस्सा वाढवणार

आम्ही बैठकीत संस्थेच्या जवळपास 5,000 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रलंबित मुद्दा उपस्थित करू, असं सीबीटीमधील कर्मचारी प्रतिनिधी हरभजन सिंग सिद्धू म्हणाले आहेत.

संबंधित दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की, इक्विटीमधील गुंतवणुकीचा हिस्सा वाढविण्यावर किंवा किमान त्याची 15 टक्के मर्यादा पूर्ण करण्यावर चर्चा होणार (EPFO Board Meeting) आहे. उच्च निवृत्तीवेतन योजनेचं गणित अद्याप स्पष्ट नाही. शिवाय, या योजनेला निधी कसा दिला जाईल याबद्दल स्पष्टता नाही. यावर जलद उपाय करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT